Home » Blog » SIR hits Mahagathbandhan  : एसआयआर  मध्ये वगळलेल्या नावांमुळे बिहारमध्ये महागठबंधनला ७५ ठिकाणी फटका

SIR hits Mahagathbandhan  : एसआयआर  मध्ये वगळलेल्या नावांमुळे बिहारमध्ये महागठबंधनला ७५ ठिकाणी फटका

by प्रतिनिधी
0 comments
SIR hits Mahagathbandhan

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या प्रचंड विजयाने आणि महागठबंधनाच्या पराभवाने मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे. राज्यातील २४३ पैकी २०२ जागा जिंकणाऱ्या एनडीएने विरोधकांचे बालेकिल्ले असलेल्या जिल्ह्यांतही अनेक जागा जिंकल्या आहेत. ‘द क्विंट’च्या अहवालानुसार, ७५ जागांवर एसआयआर मध्ये वगळलेल्या मतदारांपेक्षा विषयातील अंतर कमी आहे.

बिहारच्या २०२५ च्या निवडणुकीत एक आश्चर्यकारक पॅटर्न दिसतो—१७४ जागांवर विजयातील अंतर एसआयआर प्रक्रियेत मतदार यादीतून हटवलेल्या मतदार संख्येपेक्षा कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे, या १७४ पैकी ९१ जागांवर २०२० ते २०२५ दरम्यान राजकीय समीकरण बदलले आहे. या वेळी एनडीएने या ९१ पैकी ७५ जागा जिंकल्या. २०२० मध्ये या ९१ पैकी ७१ जागा महागठबंधनकडे आणि फक्त १४ जागा एनडीएकडे होत्या. मात्र २०२५ मध्ये एनडीएने यातल्या तब्बल ७५ जागा जिंकल्या आहेत. (SIR hits Mahagathbandhan)

यासाठी काही उदाहरणेही पाहता येतात

कुरहानी (मुजफ्फरपूर) – भाजपचा फायदा

२०२५ मध्ये भाजपने ही जागा फक्त ६१६ मतांनी जिंकली. पण येथे २४ हजारपेक्षा जास्त मतदारांची नावे यादीतून हटवली आहेत. ही जागा पूर्वी राजदकडे होती. कमी फरकाने जिंकलेली ही जागा एसआयआर चा परिणाम मानली जात आहे.

संदेश (भोजपूर) – जदयूचा फायदा

जदयूने ही जागा अवघ्या २७ मतांनी जिंकली. पण येथे २५,६८२ मतदारांची नावे वगळली गेली. २०२० मध्ये ही जागा राजदकडे होती. हा या निवडणुकीतील सर्वात कमी फरकाचा विजय आहे.

मटिहानी (बेगूसराय) – राजदचा विजय

राजदने ही जागा ५२९० मतांनी जिंकली; परंतु येथेही ३३७०० पेक्षा जास्त नावे मतदार यादीतून हटवली गेली. २०२० मध्ये ही जागा लोजपाकडे होती. म्हणजेच, काही ठिकाणी महागठबंधनालाही एसआयआर चा लाभ झाला, पण तो एनडीएच्या तुलनेत खूपच कमी आहे. (SIR hits Mahagathbandhan)

एसआयआर आणि निवडणुका – मोठे संबंध?

एनडीएचा दणदणीत विजय शंभर अतिरिक्त जागांमुळे शक्य झाला. पण त्या शंभरपैकी ७५ जागांवर हटवलेली मतदार नावे विजयाच्या फरकापेक्षा जास्त होती. यातून प्रश्न निर्माण होतो —एसआयआर दरम्यान काढलेल्या नावांमुळेच एनडीएचा फायदा झाला का? (SIR hits Mahagathbandhan)

केरळ काँग्रेसचे आरोप

केरळ काँग्रेसने गंभीर आरोप केले आहेत:

                •               एनडीएच्या २०२ जागांपैकी १२८ जागा एसआयआर दरम्यान मनमानीपणे काढलेल्या नावांमुळे जिंकल्या गेल्याचा दावा.

                •               हजारो मतदारांची नावे हटवली गेली.

                •               हा प्रकार “मुद्दाम घडवलेला गोंधळ” असल्याचा आरोप.

केरळ काँग्रेसच्या म्हणण्यानुसार

म्हणण्यानुसार, एसआयआर चे उद्दिष्ट बोगस किंवा अवैध परप्रांतीय मतदार ओळखणे होते. पण दिलेल्या डेटात एकही अवैध स्थलांतरित मतदार सापडला नाही—ना बांग्लादेशचा, ना म्यानमारचा, ना नेपाळचा. त्याऐवजी गरीब आणि दुर्बल घटकांची नावे मोठ्या प्रमाणावर हटवून निवडणूक “व्यवस्थित मॅनेज” केली.

एसआयआर वादग्रस्त का आहे?

निवडणूक आयोगाने मतदानापूर्वी SIR प्रक्रिया राबवली.

                •               डुप्लिकेट नोंदी काढणे

                •               मृत मतदार हटवणे

                •               स्थलांतरित घुसखोर मतदारांची नावे काढणे

                •               चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे

असे त्यामागचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत होते.

परंतु विरोधक आणि नागरी समाजाने मोठ्या प्रमाणावर टीका केलीः

                •               काही जिल्ह्यांत अस्वाभाविकरीत्या जास्त नावे हटवली गेली.

                •               दुर्बल घटकांच्या मतदारांची नावे योग्य पडताळणीशिवाय काढल्याचा आरोप.

निवडणूक आयोगाने मात्र हे आरोप नाकारत एसआयआर ही नियमित प्रक्रिया असल्याचा दावा केला आहे.

(द वायर च्या सौजन्याने)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00