Home » Blog » लातूर जिल्हा बँकेवर धीरज देशमुखांच्या सहकार पॅनेलचा झेंडा

लातूर जिल्हा बँकेवर धीरज देशमुखांच्या सहकार पॅनेलचा झेंडा

by प्रतिनिधी
0 comments
Dheeraj Deshmukh’s ‘Sahakar Panel’ wins the Latur District Bank election

कोल्हापूर : प्रतिनिधी : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलने १४ जागा जिंकत एकहाती सत्ता स्थापन केली. त्यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची साथ मिळाली. विरोधी भाजपच्या परिवर्तन पॅनेलला पाच जागांवर समाधान मानावे लागले. (Dheeraj Deshmukh’s ‘Sahakar Panel’ wins the Latur District Bank election)

लातूर जिल्हा बँक निवडणुकीची मतमोजणी आज सोमवारी सकाळी सुरू झाली. आमदार धीरज देशमुख यांच्या सहकार पॅनेलने १९ पैकी १४ जागांवर विजय मिळवला. भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार रमेश कराड यांच्या नेतृत्वखालील परिवर्तन पॅनेलला पाच जागांवर विजय मिळवला. जिल्हा बँकेच्या १९ जागांपैकी चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत १५ जागांसाठी ९९९ पैकी ९९३ मतदान झाले होते. आज झालेल्या मतमोजणीत निलंगा मतदारसंघात भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या काकी संगीत अशोक पाटील निलंगेकर यांचा पराभव केला. भाजप आमदार रमेश कराडे यांचे चिरंजीव ऋषिकेश कराड यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक गोविंदपूरकर यांचा पराभव केला. (Dheeraj Deshmukh’s ‘Sahakar Panel’ wins the Latur District Bank election)

उदगीर सोसायटी गटातून दिवंगत आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या कन्या प्रीती चंद्रशेखर भोसले दहा मतांनी विजयी झाल्या. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे जावई हेमंत जाधव विजयी झाली. ते सहकार पॅनेलचे उमेदवार होते. मत्स व हाउसिंग गटातून जयेश विश्वंभर माने विजयी झाले.

सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार असे

हेमंत जाधव, प्रीती भोसले, अशिष पाटील राजूरकर, संतोष पाटील, धीरज देशमुख, जगन्नाथ पाटील, जयेश माने, सर्जेराव मोरे, विवेक सिरसाठ, अविनाश जाधव, शेषराव हाके, चंद्रशेखर दंडीमे, शीतल पाटील, गीतांजली लांडगे.

परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार असे

अरविंद पाटील निलंगेकर, अतुल गंभीरे, भगवानराव पाटील तळेगावकर, ऋषिकेश कराड, शोभा पवार. (Dheeraj Deshmukh’s ‘Sahakar Panel’ wins the Latur District Bank election)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!