Home » Blog » अजित पवारांच्या अपघातप्रकरणी रोहित पवारांचा थेट फडणवीसांवर आरोप

अजित पवारांच्या अपघातप्रकरणी रोहित पवारांचा थेट फडणवीसांवर आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Rohit Pawar accuses Fadnavis in connection with Ajit Pawar's accident

मुंबई : प्रतिनिधी : अजित पवारांच्या विमान अपघाती निधनांवर घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यातच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे. अपघातग्रस्त विमान कंपनीचा मालक रोहित सिंग यांच्या विवाह समारंभात मफलर घालून देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्याचा फोटो त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवला.  या संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या कंपनीला फडणवीस वाचवत आहेत का असा आरोप रोहित पवार यांनी केला. या आरोपानंतर राज्यात आणि देशात खळबळ उडाली. भाजपकडून रोहित पवारांच्या आरोपांचे खंडन केले असून  ते  चमकोगिरीसाठी आरोप करतात असा आरोप केला आहे. (Rohit Pawar accuses Fadnavis in connection with Ajit Pawar’s accident)

अजित पवारांच्या अपघाती निधनांनतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार अपघाताचा तपास वेगाने व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या अपघातप्रकरणी विमान कंपनीच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आहेत. दोन दिवसापूर्वी सोमवारी विमान अपघातामागे एक मफलरवाला आहे असे पोस्टर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर परिसरात झळकले होते. त्यामुळे ही मफलरवाली व्यक्ती करणे याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

रोहित पवारांनी मफलर घातलेला फडणवीसांचा फोटो झळकावला

रोहित पवार यांनी मफलर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पत्रकार परिषदेत झळकावला. त्यांच्या सोबत रोहित सिंहचा फोटो दाखवला. यावेळी बोलताना रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले, जर मी माझ्या काकाला न्याय देऊ शकत नसेल आणि तडजोड करत असेल तर मी सामान्यांना न्याय देऊ शकत नाही. हे सगळं समोर आल्यावर मला कदाचित राजकीय परिणामांना सामोरे जावे लागू शकतं. पण मला त्याची चिंता नाही असे त्यांनी स्पष्ट केले. मी देवेंद्र फडणवीसांचे नाव घेतोय म्हणजे ते अजितदादांच्या अपघातामागे आहेत, असे मी म्हणत नाही. पण संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या कंपनीला फडणवीस नक्कीच वाचवत आहेत असा आरोप त्यांनी केला. (Rohit Pawar accuses Fadnavis in connection with Ajit Pawar’s accident)

व्ही.के.सिंग मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असल्याने तपास होत नाही

फडणवीसांचा फोटो आमच्याकडे अनेक दिवसांपासून होता असा दावा करत रोहित पवार यांनी पंतप्रधानांपासून ते सीबआय त्यांचे ऐकत असतानाही आतापर्यंत तपास का होऊ शकला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. व्ही.के.सिंग यांच्याजवळ राज्याचे मुख्यमंत्री असल्याने तपास होत नाही असे ठाम मत आमचे झाले आहे. तसेच राघव हा रोहित सिंह यांचा अतिशय घनिष्ठ मित्र आहे. महाराष्ट्रात ज्या दिवशी निवडणुको निकाल लागणार होता. त्याच दिवशी आपल्या राज्याचे माजी उप मुख्यमंत्री जयपूरला जाऊन त्या विवाहासाठी फक्त दीड तासांसाठी सहभागी झाले होते. आता माझ्या एकाद्या भावाचं किंवा बहिणीचं लग्न असतं तर मी गेलो नसतो. कारण निवडणुकीमुळे माझ्यावर प्रेशर असतं. पण तरीही मुख्यमंत्री फडणवीस तिथे का गेले? असा प्रश्न रोहित पवारांनी केला त्याचे संबध महत्वपूर्ण आणि जवळचे होते असा दावा केला.

अपघातातील जबाबदारांना दादांचा पुतण्या अजिबात सोडणार नाही

रोहित पवार यांनी हिंमत असेल तर व्हीएसआर आणि व्ही.के.सिंह यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.आमचे सरकार कधी ना कधी येईल तेव्हा आकाशात असो वा पाताळात कुठेही असता तरी अपघातात जबाबदार असलेल्या व्यक्तीला तुम्ही सोडून दिले तरी अजित दादांचा हा पुतण्या त्यांना अजिबात सोडणार नाही हा माझा शब्द आहे असा इशाराही त्यांनी दिला.

विमान अपघात चौकशीच्या अहवाल लवकर यावा; फडणवीसांची शाहांकडे विनंती

दरम्यान आज सोमवारी (दि.१६) पुणे जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अजित पवारांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अजितदादांच्या जाण्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने घटनेबाबत चर्चा झाल्या आहेत. सर्वसामान्य माणसालाही नेमके काय घडले? हा अपघात होता की त्यामागे आणखी काही कारण होते? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे या प्रकरणातील खरी माहिती समोर येणे आवश्यक आहे. जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर समोर येणे आवश्यक आहे. अमित शाह यांच्याकडे लवकर अहवाल मिळावा अशी विनंती केली आहे. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर रोहित पवारांनी थेट मुख्यमंत्र्याचे नाव घेतल्याने विमान अपघाताविषयी संशय वाढला आहे. (Rohit Pawar accuses Fadnavis in connection with Ajit Pawar’s accident)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!