Home » Blog » जातनिहाय जनगणनेचा मुद्दा  सर्वप्रथम राहुल गांधींनीच मांडला:  सिरिवेल्ला प्रसाद

जातनिहाय जनगणनेचा मुद्दा  सर्वप्रथम राहुल गांधींनीच मांडला:  सिरिवेल्ला प्रसाद

by प्रतिनिधी
0 comments
Sirivella Prasad raised the OBC issue

जमीर काझी : मुंबई : जातीव्यवस्थेच्या रचनेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा गैरवापर मनुवाद्यांनी केला आहे. जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा मोठा असून त्यासाठी राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जोरकसपणे पुढे आणला आहे. प्रत्येक समाजाची  लोकसंख्येच्या  प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी  जातनिहाय जनगणनेचा आग्रह त्यांनी धरला. त्यामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांनी केले आहे. (Sirivella Prasad raised the OBC issue)

काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे रविवारी ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर व ‘मंडल विरुद्ध मनूवाद’ पुस्तकाचा प्रकाशन  प्रसंगी ते बोलत होते. यावेळी  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव रेहाना चिस्ती, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, खासदार प्रतिभा धानोरकर, प्रवक्ते हनुमंत पवार आदी प्रमुख उपस्थित होते.

फडणवीसांनी मराठा व ओबीसी समाजात भांडणे लावली

यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रात आरक्षणासाठी विविध समाजाची आंदोलने सुरु आहेत. आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा वाढवणे व जातनिहाय जनगणना करणे हाच रामबाण उपाय आहे पण भाजपा सरकार ते करत नाही. राज्यात आरक्षणाची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोडा, तोडा व राज्य करा ही ब्रिटिशांची निती वापरून मराठा व ओबीसी समाजात भांडणे लावली आहेत.’  (Sirivella Prasad raised the OBC issue)

ओबीसींच्या हक्कासाठी राहूल गांधींनी सर्वप्रथम आवाज उठवला

आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाज भाजपाच्या पाठीशी उभा राहिला पण भाजपाने या समाजाला काहीही दिले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसींच्या हक्कांसाठी पहिला आवाज उठवला. राहुल गांधी यांनी आवाज उठवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणनेची घोषणा केली. मंडल आयोगाने ओबीसी समाजासाठी २७ टक्के आरक्षणाची शिफारस होती हे आरक्षण सामाजिक, शैक्षणिक, नोकऱ्यांसाठी होते पण मंडल आयोगाच्या आंदोलनात शिरकाव करून मनुवाद्यांनी ओबीसी समाजात गैरसमज पसरवले. मनुवाद्याने जातीजातीमध्ये विष पेरण्याचे काम केले आहे. मनुवादाचा हा विचार गाडण्याचे काम समतेचा विचारच करु शकते, असे वडेट्टीवार म्हणाले. 

‘हर एक ओबीसी, बनेगा काँग्रेसी’,

 प्रा. यशपाल भिंगे म्हणाले की, देशात ओबीसी समाजाला चेहरा देण्याचे काम बिहारचे माजी मुख्यमंत्री बी. पी. मंडल यांनी देऊन मोठे उपकार केले आहेत. ओबीसी समाज फक्त मतदान करणारा नाही तर नेतृत्व करणारा बनला पाहिजे आणि त्यासाठी ‘हर एक ओबीसी, बनेगा काँग्रेसी’, हा संकल्प केला आहे असे प्रा. भिंगे म्हणाले. ‘मंडल विरुद्ध मनुवाद’ हे पुस्तक सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही कळावे यासाठी लिहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. (Sirivella Prasad raised the OBC issue)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!