Nanded Accident : ट्रॅक्टर विहिरीत कोसळून आठ ठार

Nanded Accident

नांदेड :  हळद काढणीसाठी महिलांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या भीषण अपघात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर येथे शुक्रवारी (४ एप्रिल) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. (Nanded Accident)

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील या शेतकरी महिला मजूर होत्या. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. यावेळी मोठा आवाज आल्याने परिसरातील शेतात काम करणाऱ्या मजूर आणि गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. ईरबाजी सरोदे यांनी पुरभाबाई कांबळे, पार्वती भुरड व सटवा जाधव यांना विहिरीबाहेर काढले. मात्र, ते आपल्या पत्नीला बाहेर काढू शकले नाहीत.  ताराबाई जाधव त्यांची मुलगी धुरपता जाधव,  मीना राऊत, ज्योती सरोदे, चौतराबाई पारदे, सरस्वती भुरड, सिमरन कांबळे अशा सात महिला विहिरीत पडल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांना बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. (Nanded Accident)

टायर स्लीप होऊन अपघात

या अपघाताची प्रत्यक्षदर्शनींनी माहिती दिली. सकाळी साडेतसातच्या सुमारास हळद काढणीसाठी महिला मजुरांना घेऊन ट्रॅक्टर निघाला होता. ट्रॉलीमध्ये महिला मजूर बसल्या होत्या. या परिसरात गेले काही दिवस अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे चिखल झाला आहे. ट्रॅक्टरचे चाक स्लीप झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह विहिरीत कोसळला. (Nanded Accident)

हेही वाचा :

 मंगेशकर हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

मनोजकुमार यांचे निधन

Related posts

Valmik’s encounter plan: वाल्मीक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर होती…

Salman Khan : बॉम्बने गाडी उडवण्याची सलमानला धमकी

Coast Guard : १८०० कोटी किमतीचे अमली पदार्थ जप्त