नवी दिल्ली : राज्यघटना दुरूस्तीचे बीज देशाचे पहिले पंतप्रधान नेहरूंनी पेरले. इंदिरा गांधींनीही तेच केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही उलटवला होता, अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना मोदींनी तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. ( modi’s retort)
राज्यघटना अडथळा ठरत असेल तर त्यात बदल (दुरुस्ती) केले पाहिजेत, असे पंतप्रधान नेहरूंनीच सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हटले होते, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. तत्कालीन राष्ट्रपती आणि सभापती यांनी नेहरूंना यासंदर्भात इशारा दिला होता. परंतु त्यांनी संविधानाचा स्वतःचा अर्थ लावला. संविधानात बदल करण्याची काँग्रेसची जुनीच खोड आहे. त्यानंतर काँग्रेसने संविधानात बदल करण्याचा सपाटाच लावला, असा आरोप मोदी यांनी केला. ( modi’s retort)
ते म्हणाले, त्यांच्या सत्ताकाळात म्हणजे सुमारे सहा दशकात ७५ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली. या सवयीचे बीज पहिल्या पंतप्रधानांनी पेरले आणि इंदिरा गांधींनी जोपासले. सर्वोच्च न्यायालयाच्या १९७१ च्या निर्णयाची अवहेलना करून त्यांनी न्यायपालिकेची शक्ती कमी करण्यासाठी संविधानात बदल केले.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी शाहबानो प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल जोरदार टीका केली. मूलतत्त्ववादी घटकांची बाजू घेऊन संविधानाच्या भावनेचा बळी घेतला. मुस्लीम महिलांच्या हक्कांचे समर्थन करणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उलथवून टाकला, असा आरोप मोदी यांनी राजीव गांधींवर केला.( modi’s retort)
काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसने राष्ट्रीय सल्लागार परिषद ही गैर-संवैधानिक संस्था निर्माण केली. सोनिया गांधी या परिषदेच्या अध्यक्ष होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
मोदी म्हणाले की, गठ्ठा मताचे राजकारण करणाऱ्यांनी आरक्षणाशी खेळ केला. एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे नुकसान केले. मंडल आयोगाच्या अहवालाकडे दुर्लक्ष केले. काँग्रेस सरकार हटल्यानंतरच मंडल आयोगामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले.
हेही वाचा :