मंत्र्याच्या चालकाने हॉर्न वाजवल्याने दोन गटात राडा

जळगाव; प्रतिनिधी : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन गटात राडा झाला. जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात ही घटना घडली. यावेळी संतप्त जमावाने दगडफेक करत जाळपोळ केली. या घटनेत १२ ते १५ दुकाने जळून भस्मसात झाली. या घटनेने परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिस प्रशासनाने गावात संचारबंदी पुकारली आहे. (Minister Gulab Patil)

काल (३१) मध्यरात्रीच्या सुमारास मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवाराला घेऊन चारचाकी वाहन पाळधी गावातून जात होती. यावेळी वाहनचालकाने हॉर्न वाजवला आणि कट मारल्याने काही व्यक्तीसमवेत वाद झाला. या घटनेनंतर पाळधी गावचे तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. गोंधळाचे रुपांतर हातघाईवर येत दगडफेकीस सुरुवात झाली. यावेळी काही जणांनी दगडफेक दुकाने पेटवून दिली. त्यामध्ये १२ ते १५ दुकाने जळून खाक झाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दगडफेक आणि जाळपोळ करण्याऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

पाळधी गावात संचारबंदी लागू केली असून उद्या (दि.२) गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. परिस्थिती निवळेल तशी संचारबंदीचा कालावधी कमी केला जाणार आहे. आत्तापर्यंत वीस ते पंचवीस अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जाळपोळ करणाऱ्यांचा पोलिस शोध घेत असून काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जात आहे. मंत्र्यांच्या वाहनांना अडवण्याचा झालेला प्रयत्न गंभीर असल्याने पोलिस प्रशासनाने हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे. (Minister Gulab Patil)

हेही वाचा :

Related posts

भुजबळ, वळसे-पाटील, मुनगंटीवारांचा पत्ता कट, १६ मराठा-१७ओबीसी मंत्री

मधुकर पिचडांनी मांडले पहिले `आदिवासी` बजेट

मधुकर पिचड यांचे निधन