साखरेचा किमान विक्री दर वाढायला हवा : वैभवकाका नायकवडी

वाळवा; प्रतिनिधी : साखरेचा किमान विक्री दर (एम.एस.पी) वाढला तरच साखर उद्योग टिकणार आहे. हा दर किमान ४२०० रुपये प्रती क्विंटल होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी यांनी केले. कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाच्या आधुनिकीकरणाचा शुभारंभ दसऱ्याच्या मुर्हूतावर झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचे संचालक, सभासद, शेतकरी, मान्यवर, कार्यकर्ते यांवेळी उपस्थित होते. (Sangli News)

वैभवकाका नायकवडी म्हणाले, “ देशातील एकूण साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो. त्यामध्ये दक्षिण महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. पूर्वी कारखान्यातील मोलॅसिस, बगॅस निरुपोयोगी वाटत असे मात्र आता त्यापासून अल्कोहोल/इथेनॉलची निर्मिती होते, बगॅसला प्रतीटन रु.२००० /-ते रु.३०००/- इतका दर येत आहे. प्रेसमड स्पेंटवॉशच्या मिश्रणापासून गॅस निर्मिती होऊ लागली आहे. इथेनॉलच्या इंधनामधील मिश्रणामुळे देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचत आहे. इंधनामधील इथेनॉल मिश्रणाचा सरकारचा निर्णय हा निश्चितीच कौतुकास्पद आहे. साखर कारखान्यांमधील ७० टक्के आर्थिक उत्पन्न साखर निर्मितीतून आहे. त्यामुळे साखरेचा विक्री दर (एम.एस.पी) वाढला तरच साखर उद्योग टिकणार आहे. त्याकरिता साखरेचा विक्री दर (एम.एस.पी.) किमान ४२०० रुपये प्रती क्विंटल होणे अत्यावशक आहे.”

क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नांवे महामंडळ स्थापन केल्याबद्दल वैभवकाका यांनी राज्य शासनाचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. यावेळी गौरवभाऊ नायकवडी यांनीही मनोगत व्यक्त केले. (Sangli News)

कार्यक्रमास कारखान्याचे व्हा.चेअरमन,संचालक, हुतात्मा सहकारी बँकेचे चेअरमन किरणदादा नायकवडी, हुतात्मा दूध संघाचे चेअरमन व कारखान्याचे संचालक गौरवभाऊ नायकवडी, कारखान्याचे माजी चेअरमन महादेव कांबळे (काका), हुतात्मा बझारचे चेअरमन दिनकर बाबर, वीरधवल नायकवडी, केदार नायकवडी, हुतात्मा शिक्षण उद्योग समुहातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सभासद, शेतकरी, कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत कार्यकारी संचालक राम पाटील यांनी केले. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी आभार मानले.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी