Masood मोस्ट वाँटेड दहशतवादी मसूद अझरला हृदयविकाराचा झटका

masood

इस्लामाबाद : भारतातील दहशतवादी कारवाईतील मास्टर माईंड आणि भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी, जैश-ए-मोहम्मदचा चिफ मसूद अझरला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याला उपचारासाठी अफगाणिस्तानहून कराची शहरात हलवण्यात आले आहे. (Masood )

अफगानिस्तानमधील खोस्त प्रातांत अझर मेहमुद दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता. त्याच वेळी त्याला हृदयविकाराचा जोरात झटका बसून तो खाली कोसळला. त्याला उपचारासाठी अफगानिस्तानहून पाकिस्तानला हलवण्यात आले. एका विशेष रुग्णवाहिकेने त्याला पाकिस्तानातील कराची येथील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले आहे. उपचाराच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मसूदला कराचीतून रावळपिंडी अथवा इस्लमाबादमधील मोठ्या हॉस्पिटलमध्ये  उपचारास दाखल करण्याची चर्चा सुरू झाली आहे.(Masood )

जैश-ए-मोहमंद प्रमुख मसूद अझरला संयुक्त राष्ट्राने आंतकवादी घोषीत केले आहे. भारतात अनेक दहशतवादी कारवाईत त्याला मास्टर माईंड मानले जाते. पाकिस्तान सरकार आणि लष्कर त्याला मदत करत असते. पाकिस्तानने त्याला सुरक्षितता दिली असल्याने आंतरराष्ट्रीय मंचावर सातत्याने भारताविरुध्द कायम गरळ ओकत असतो. काही दिवसापूर्वी त्याने पाकिस्तानाही बहावलपूर येथे जाहीर सभेत भाषण दिले होते. या सभेत त्याने भारताविरुध्द गरळ ओकली होती.

Related posts

‘सौर कृषी पंप योजने’त महाराष्ट्र अव्वल

देशाच्या आर्थिक स्वातंत्र्यलढ्यात डॉ मनमोहन सिंग यांचे नाव अजरामर

Manmohan Singh : स्टेट्समन