लिप शेड

सौंदर्यासक्ती हा जीवनशैलीचा भाग आहे. सुंदर आणि उठावदार दिसणं प्रत्येकालाच आवडतं. महिला याबाबतीत अधिकच चोखंदळ असतात. त्यासाठी विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापरही आलाच. सुंदर आणि रूबाबदार वाढवण्यात अन्य सौंदर्यप्रसाधनांचा वापर जसा महत्त्वाचा असतो त्यात लिपस्टिकची अचूक निवड कौशल्याचं असतं.

चारचौघांत आपला पोशाख, केशरचना आणि नीटनेटकेपणा या बाबी आपले व्यक्तिमत्त्व उठावदार बनवतात. चोखंदळ महिला याचे भान सतत ठेवतात. मात्र बऱ्याचदा त्यांच्या मेकअपमधील लिपस्टिकची निवड मात्र चुकते. आपला पोशाख आणि स्कीनचा विचार करून ही निवड केली तर व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होते. भारतीय त्वचेच्या टोनसाठी, क्लासिक लाल किंवा एक्झॉटक मरून यांसारख्या लिप शेड्स वापरल्या तर डस्की टोन इफेक्ट आणता येतो. त्यामुळे एक मोहकता येते. परंतु, बहुतेक वेळा फिकट छटांची निवड केली जाते. त्यामळे आपल्या स्कीन टोनला मॅच होत नाहीत. परिणामी पैसे, श्रम आणि लिपस्टिकही वाया जाते. तथापि, आपल्या स्कीन टोनसाठी योग्य लिप शेड निवडली तर आकर्षकपणाला बाधा येणार नाही.

  • नेहमीच अंडरटोनचा विचार करा, त्याबाबतची वस्तूस्थिती स्वीकारा. तुम्ही उबदार शेड्सला प्राधान्य देत असला तरी पीच आणि कोरलचा रंग समजून घ्या. तुम्हाला थंड रंगछटा आवडत असतील तर बेरी किंवा माउव्ह टोन निवडा.
  • कार्यक्रम कोणता, पार्टी आणि फंक्शन कोणते, याचा विचार करा. नियमीत पोशाखांसाठी सूक्ष्म किंवा सौम्य गुलाबी आणि तपकिरी छटा वापरून पहा. परंतु विशेष प्रसंग आणि फंक्शनवेळी तुम्ही बोल्ड रेड आणि मरून टोन निवडू शकता. उबदार टोनची लिपस्टिक
  • तुमच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशाच टोन निवडा. शेड्स मिसळून पहा. जोपर्यंत तुम्हाला अनुकूल असा टोन मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करा. त्यासाठी सकारात्मक रहा.
  • काही वेळा चुका होतील, पण ट्रायल अँड एररवर प्रयत्न करीत रहा. चांगल्या दिसतील त्या शेड्स वापरण्याबाबत अजिबात संकोच बाळगू नका. मैत्रिणींची कॉमेंट किंवा जवळच्या व्यक्तीचे मत जरूर विचारात घ्या. विनासंकोच धाडस करा. कारण तुमच्या व्यक्तिमत्वाचा तो भाग आहे.  शेड पक्की झाली की कायमस्वरूपी वापरण्याचा विचार करा.
  • शेड अप्लाय करण्यासाठी हातावर लावून पहा. त्यावरून ती ओठांवर कशी दिसेल याचा अंदाज येईल. मगच वापरा. त्यामुळे सुबकता आणि सौंदर्याचा मिलाप व्हायला मदत होते. सौंदर्यतज्ज्ञाचा सल्लाही महत्त्वाचा ठरतो. पण व्यक्तिश: प्रयोग केल्यामुळे निवड अधिक अचूक ठरण्याची शक्यता असते.

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ