Lawers Gang :अधिकाऱ्यांना लुटणाऱ्या वकिलांच्या टोळीचा पर्दापाश

Lawers Gang

Lawers Gang

महाराष्ट्र दिनमान डेस्क  : उत्तरप्रदेशातील लखनौमधील एक महिला वकील अधिकाऱ्यांना खोट्या कागदपत्राद्वारे लुटत होती. तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. तिच्या टोळीत  ज्येष्ठ वकिलासह अनेक सहकारी होते. ही टोळी अधिकाऱ्यांना लुटत असल्याची माहिती उघड झाली असून पोलीस या गुन्ह्याचा बारकाईने तपास करत आहेत.(Lawers Gang)

गोमतीनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी राजेश कुमार यांनी गुन्ह्याची माहिती दिली. बनारसमधील एपीओ पदावरील दीपक कुमार लखनौमधील अशियाना परिसरात वास्तव्य करतात. त्यांच्या विरोधात एका महिला वकिलाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्या दीपक कुमार यांच्या म्हणण्यानुसार, शालिनी शर्मा या जनक नगर सुहारनपूर येथील रहिवाशी आहेत. त्या अलाहाबाद हायकोर्टात वकील आहेत. शालिनी शर्मा यांनी दीपक कुमार यांच्याविरोधात खोटी तक्रार दिली आहे. (Lawers Gang)

दीपककुमार यांचे म्हणणे आहे की शालिनी यांनी एक बनावट मॅरेज सर्टिफिकेट सादर केले आहे. त्यामध्ये असा दावा केला आहे की दोन जानेवारी २००१ चे सहारणपूरमधील मॅरेज रजिस्टर ऑफीसमधील हे सर्टिफिकेट आहे. त्यानंतर दीपक कुमार यांनी सर्टिफिकेटची माहिती घेण्यास सुरवात केली असता सहारनपूरमध्ये शालिनी शर्माच्या विवाहाची नोंदच झालेली नाही. शालिनी या पैशासाठी बोगस आणि बनावट कागदपत्रे देत होत्या. बार काउंसिलमध्ये या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर बनावटगिरीचा खुलासा झाला. (Lawers Gang)

 ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार वकील शालिनी शर्मा एका टोळीसमवेत काम करत होती. जे उच्च अधिकारी आहेत त्यांच्यावर खोटे आरोप करुन पैसे वसूल केले जात होते. शालिनी शर्मा अशा अधिकाऱ्यांशी संपर्क करायची. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायची. एखाद्या अधिकाऱ्याने पैसे देण्यास नकार दिला की ती कोर्टात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करायची. (Lawers Gang)

वकिलांची गँग हायकोर्टाचे वकील अशोक कुमार पांडे चालवत असल्याची माहिती पुढे आली आहे. ते शालिनीला मदत करायचे आणि ते तिच्यापेक्षा सिनीअर आहेत. त्यांच्या मदतीने ती न्यायालयाकडून आदेश प्राप्त करायची. गँगमध्ये शालिनीचा सहारनपूरचा मित्र वसिम सहभागी आहे. तो खोट्या गुन्ह्याखाली अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचा. वसिम मेडिकलचे सर्टिफिकेट तयार करायचा. त्यामुळे आरोपाची गंभीरता वाढायची.

हेही वाचा :

मुलाच्या जखमेवर टाक्याऐवजी फेविक्विक

अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवे वळण

 चाळीस तास बेड्या घातलेल्या अवस्थेत

Related posts

UPSC Result

UPSC Result: ‘यूपीएससी’त शक्ती दुबे देशात अव्वल

Dhankhar reiterated

Dhankhar reiterated: संसदच सर्वोच्च

Delhi HC slammed Radev baba

Delhi HC slammed Radev baba : रामदेवबाबांची दिल्ली हायकोर्टाकडून कानउघाडणी