Lalu Yadav : लालूप्रसाद यादव यांची प्रकृती चिंताजनक

Lalu Yadav

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना एअर ॲम्ब्युलन्सने तातडीने उपचारासाठी दिल्लीत हलवण्यात आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. त्यांना ब्लड शुगरचा त्रास असून हा रोग बळावला असल्याचे सांगण्यात आले. (Lalu Yadav)

मंगळवारी लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्याने यांना पाटणा येथील पारस हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले. त्यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच आरजेडीच्या नेत्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना दिल्लीत हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.(Lalu Yadav)

तेजस्वी यादव यांनी दिली माहिती

तेजस्वी यादव यांनी सांगितले की दोन दिवसापासून लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली आहे. मंगळवारी प्रकृती जास्तच बिघडली. ब्लड शुगर वाढल्याने त्रास वाढला आहे. त्यांचे ब्लड प्रेशर अचानक उतरले. त्यामुळे त्यांना पारस हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले.

अनेक दिवस उपचार

लालू प्रसाद यादव बरेच दिवस आजारी असून यापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. २०२४ मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यांना एक स्टेंट बसवला आहे. २०२२ मध्ये सिंगापूरमध्ये त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी किडनी दान केली आहे. किडनी प्रत्योरोपण शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. पण वाढत्या वयोमानामुळे ते वारंवार आजारी पडत आहेत.

हेही वाचा :   

अजित पवार काकांबद्दल म्हणाले…

उद्योगपती, बिल्डरांना जमिनी देण्याचा डाव

Related posts

Khadase : मंत्री महाजनांचे महिला अधिकाऱ्यांशी संबध

Dallewal : शेतकरी नेते दलेवाल यांनी १३१ दिवसांनी उपोषण सोडले

Bumrah : बुमराह मुंबई संघात परतला