कोल्हापूर; प्रतिनिधी : कालबाह्य औषधापासून प्रदूषण होऊ नये, ती उघड्यावर आणि कचऱ्यात टाकली जाऊ नयेत यासाठी कालबाह्य औषधे म्हणजेच एक्सपायर डेट औषधे संकलित करण्याचा निर्णय कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनने उपक्रम होती घेतला आहे. जिल्ह्यातील अंदाजे तीन हजार आठशे औषध दुकानात एका पेटीत कालबाह्य औषधे जमा केली जाणार आहेत. या औषधांची शास्त्रीय पद्धतीने बायोवेस्ट यंत्रणेमार्फत विल्हेवाट लावली जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे. (Kolhapur News)
असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील आणि सचिव प्रल्हाद खवरे यांनी या उपक्रमाची पत्रकार परिषदेत माहिती दिली. हल्ली आरोग्याच्या तक्रारी वाढल्या असून आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे घरोघरी औषधांचा वापरही वाढत आहे. काही वेळा औषधे शिल्लक राहतात आणि कालबाह्य होतात. अशी औषधे कचऱ्यात अथवा उघड्यावर फेकली जातात. त्यातून प्रदूषणाचा धोका वाढला आहे. औषधांचा कचरा ही समस्या निर्माण झाली असून त्यापासून अपाय होण्याचा धोका नाकारता येत नाही.
कालबाह्य औषधे उघड्यावर टाकू नयेत आणि एका जागेवर संकलित करावी यासाठी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशनने उपक्रम आखला आहेत. कालबाह्य झालेली औषधे असोसिएशन सदस्यांच्या औषधाच्या दुकानात जमा केली जाणार आहेत. त्यासाठी असोसिएशनच्यावतीने दिलेल्या एक पेटीत जमा केली जाणार आहेत. त्यानंतर सर्व जमा झालेली कालबाह्य औषधांची विल्हेवाट बोयवेस्ट यंत्रणेमार्फत लावली जाणार आहेत. पत्रकार परिषदेला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, संदीप मिसाळ, दाजीबा पाटील, सचिन पाटील, अदित्य चौगुले, दीपक वाडकर, विशाल नलवडे उपस्थित होते. (Kolhapur News)