कोल्हापूर फुटबॉल हंगामाचा उद्या ‘किक ऑफ’

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला उद्या गुरुवारी (दि.२) सुरुवात होत आहे. विधानसभा निवडणूक आणि फुटबॉल संघ आणि खेळाडू नोंदणीच्या प्रक्रियेला वेळ झाल्याने यंदा तब्बल पावनेदोन महिन्याने हंगामास सुरुवात होत आहे. केएसए वरिष्ठ अ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि वर्षा विश्वास तरुण मंडळ यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे.

केएसए अ गट फुटबॉल साखळी स्पर्धेत वरिष्ठ गटातील १६ संघामध्ये दोन गटात प्रत्येकी आठ संघांचे दोन गट पाडण्यात आले असून त्यांच्यात साखळी सामने होणार आहेत. एकूण ५६ सामने होणार असून हे सामने एक महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. पहिला सामना फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि वर्षा विश्वास तरुण मंडळामध्ये दुपारी दीड वाजता सामना होणार आहे.

दुपारी साडेतीन वाजता खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते आणि पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या प्रमुख उपस्थित या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी शहर पोलिस उप अधीक्षक अजित टिके, कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनचे मालोजीराजे, विफा महिला संघटनेच्या अध्यक्षा मधुरिमाराजे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी चार वाजता दुसरा सामना श्री शिवाजी तरुण मंडळ व संध्यामठ तरुण मंडळ यांच्यामध्ये होणार आहे.

हेही वाचा :

Related posts

KMC Water: कोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणीपुरवठा बंद

‘शिवाजी’, ‘वर्षा विश्वास’ संघांची विजयी सलामी

Kolhapur News : दारु पिणाऱ्या ३२१ जणांवर कारवाई