कोल्हापूर: प्रतिनिधी; महिला बचत गटाची प्रमुख असलेल्या महिलेने गटातील सर्व महिलांकडून कर्जाच्या हप्त्यांची रक्कम जमा केली. जमा झालेली तीन लाख रुपयांची रक्कम बचत गटाच्या प्रमुखाने फायनान्स कंपनीच्या क्लार्ककडे दिली. बचत गटाच्या प्रमुख महिलेच्या मुलाने आपल्या आईने फायनान्स कंपनीच्या क्लार्ककडे तीन लाख रुपये असलेली माहिती त्याने मित्रांना दिली. त्यानंतर मित्रांनी फायनान्स कंपनीच्या क्लार्कचा पाठलाग करुन त्याला बेदम करुन पावनेचार लाख रुपयांची रक्कम लुटली. पण पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात पाच संशयितांना ताब्यात गुन्ह्याचा छडा लावून त्यांच्याकडून तीन लाख ७३ हजार ३७७ रुपये जप्त केले. (Kolhapur Crime)
फायनान्स कंपनीचे क्लार्क आकाश शिंदे (वय २७ रा. माले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) हे महिला बचत गटाकडून जमा केलेली तीन लाख ६१ हजार ३७७ रुपयांची रक्कम घेऊन गुरुवारी (दि.५) लिशा हॉटेल जवळील भारत फायनान्स कंपनीत भरण्यास जात होते. ते सायकलवरुन जात असताना गुरुकुल रेसिडन्सीजवळ मोपेडवरुन आलेल्या चारजणांनी त्यांना अडवले. ‘राजेंद्र नगरात येऊन दादागिरी करतोस काय?’ असे म्हणून लाथाबुक्कयांनी त्यांना बेदम मारहाण करुन पैशाची बॅग, सॅमसन कंपनीचा टॅब, बायोमॅट्रिक मशिन जबरदस्तीने हिसकावून नेले. बॅगेत तीन लाख ६१ हजार, ३७७ रुपये होते. त्यानंतर आकाश शिंदे यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Kolhapur Crime)
राजारामपुरी पोलिसांबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही या गुन्ह्याचा तपास सुरु केला. पोलिस हवालदार वैभव पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. साळोखे पार्क येथे बचत गटाची रक्कम माहिलांकडून गोळा करणाऱ्या संगिता शिंदे यांचा मुलगा सनी शिंदे यानेच रोख रक्कम लुटण्याचा कट रचल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयित सनी शिंदे याला ताब्यात घेतले असता त्याने दरोड्याच्या कटाची माहिती दिली. फायनान्स कंपनीच्या क्लार्कला आईने तीन लाख रुपये दिल्याचे मी पाहिले होते. क्लार्ककडे मोठी रक्कम असल्याची माहिती त्याने मित्रांना दिली. त्यानंतर त्याच्या चार मित्रांनी फायनान्स कंपनीचा क्लार्कला मारहाण करुन तीन लाख ६१ हजार रुपये, लॅपटॉप,बायोमॅट्रिक मशिन लुटल्याची माहिती दिली. पोलिसांनी सनी बाबासाहेब शिंदे (वय २९), किरण स्वामी वैदु (३१, दोघे रा. साळोखे पार्क, राजेंद्रनगर. कोल्हापूर), अभिजीत अनिल आवळे, विजय सुरेश कदम (२०), रोहित सरेश पाटील (२१, तिघे रा. जवाहरनगर झोपडपट्टी, जुना कंदलगाव नाका, कोल्हापूऱ) यांना अटक केली.
#कोल्हापूर_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरी
दरोडा घालून रोख रकमेसह 3,73,377/- रुपयाचा मुद्देमाल लुटणाऱ्या पाच आरोपींना 24 तासात जेरबंद केले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कामगिरी. pic.twitter.com/OnzQeDVtXN— कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@KOLHAPUR_POLICE) December 7, 2024
हेही वाचा :