Kolhapur Carrom : कॅरममध्ये भस्मे विजेता

Kolhapur Carrom

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा निवड चाचणी आणि अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पन्नास वर्षांरील प्रौढ गटात

शिवशंकर भस्मे यांनी गतविजेत्या सर्फराज शेखवर मात केली. अटीतटीच्या लढतीत भस्मे यांनी २६ /४ , ४/२५  ११/८ अशा गुणाने शेख यांचा पराभव करत गतवर्षी झालेल्या पराभवाची परतफेड केली. (Kolhapur Carrom)

कोल्हापूर जिल्हा कॅरम असोसिएशन वतीने पीरवाडी येथील सावली केअर सेंटरच्या वातानुकूलित हॉलमध्ये स्पर्धा झाल्या.

पहिल्या गेममध्ये सर्फराजने अतिशय सुरेख कट आणि परतीचे अचूक शॉट मारले. पिसेस न चुकता अलगद पॉकेटमध्ये पाडत पडत पहिल्या गेममध्ये सहा बोर्डमध्येच २६ /४ असे गुण घेत एक गेमची आघाडी घेतली. (Kolhapur Carrom)

दुसऱ्या गेममध्ये  शिवशंकर भस्मे यांनी स्वत:ला सावरत पहिल्या चार बोर्डमध्येच अतिशय लाजवाब कट मारत १४ गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये सर्फराज यांची लय बिघडली. पॉकेटजवळील आणि समोरच्या पिसेसही चुकू लागल्या. या संधीचा अचूक फायदा घेत शिवशंकरने दुसऱ्या गेमला २५ /११ अशी बरोबरी केली.

 तिसऱ्या गेममध्येही सर्फराजला सूर सापडला नाही. तो अनेक चुका करू लागला. याचा अचूक फायदा घेऊन भस्मे यांनी तिसरा गेम ११ /८ असा घेत मागील पराभवाचा बदला घेतला आणि कारकिर्दीतील पहिले विजेतेपद मिळविले.

 आधी झालेल्या उपांत्य फेरीत सर्फराजने संतोष देशपांडे याचा तर शिवशंकर भस्मे यांनी सचिन देसाई याचा अटीतटीच्या लढतीत पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. (Kolhapur Carrom)

ओपन खुला गटात रोहित चौगुले ओमकार वडर, मंजूर शेख जमीर अत्तार, अख्तर शेख, इक्बाल बागवान, सम्राट लकडे, दर्शन कर्वे  यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचे उदघाटन सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे व अॅड. बाळासाहेब देशपांडे यांच्याहस्ते झाले.

यावेळी असोसिएशनचे सचिव विजय जाधव, प्रा. विराज जाधव, नामदेव टमके, पंच सूर्यकांत पाटील श्रीकांत कोल्ले ॠषिराज देशपांडे, अख्तर शेख उपस्थित होते.

नवी मुंबई ठाणे येथे होणाऱ्या पन्नास वर्षांवरील गटात शिवशंकर भस्मे व सर्फराज शेख यांची निवड झाली.

प्रौढ गटात तृतीय क्रमांक सचिन देसाई तर चतुर्थ क्रमांक संतोष देशपांडे यांनी मिळवला.

सूर्यकांत पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.

हेही वाचा :
वैभवची विक्रमांना गवसणी
भारताचा सलग दुसरा विजय

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक