नवी दिल्ली : टाटा आयपीएल टी व्टेंटी क्रिकेट स्पर्धेत बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर केएल राहूलने ९३ धावांची दमदारी फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्स संघाला विजय मिळवून दिला. राहूलने षटकार खेचत विजय मिळवत कांतारा स्टाईलने सेलिब्रेशन केले. ‘हे माझे ग्राउंड आहे’ असे तो म्हणाला. राहूल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असला तरी बेंगळुरुचे चेन्नास्वामी स्टेडियम त्याचे होम ग्राउंड आहे. रणजी सामन्यात तो कर्नाटकाकडून प्रतिनिधीत्व करतो. (Kantara celebration)
रॉयल चॅलेंजर्स बेंगुरुळू संघाचे १६४ धावांचे आव्हान पेलताना सुरुवातीच्या काळात दिल्ली संघ अडचणीत होता. पण केएल राहूलने खेळपट्टीवर नांगर टाकून दिल्ली संघाला विजय मिळवून दिला. त्याने ५३ चेंडूत नऊ चौकार आणि पाच षटकार खेचत नाबाद ९३ धावांची रोमहर्षक खेळी केली. ‘बेंगळुरु बॉय’ असलेल्या केएल राहूलने बेंगळुरुच्या होम पिचवर मॅचविनिंग खेळी केली. (Kantara celebration)
दिल्लीवर कॅपिटल्सच्या विजयावर षटकार खेचत के.एल. राहूलने क्षणार्धात तलवारीसारखी बॅट मैदानावर फिरवली, आणि आपल्या अधिकारपदावर शिक्कामोर्तब केले. त्याने शर्टच्या बॅचकडे बोट दाखवत त्याने घोषित केले की ‘ये मरा मैदान है’. सामन्यानंतर तो म्हणाला, हे माझे मैदान आहे. माझे घर आहे. हे मैदान इतरांपेक्षा मला जास्त माहित आहे. (Kantara celebration)
दिल्ली कॅपिटल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेल्या सेलिब्रेशनमागील माहिती दिली. तो म्हणाला “ हे माझ्यासाठी एक खास ठिकाण आहे. मी केलेले सेलिब्रेशन माझ्या आवडत्या कांतारा चित्रपटातील एक प्रसंगावर आधारित होते. मी एक छोटीशी आठवण करु देता. हे मैदान माझे घर आहे. या मैदानावरच मी लहानाचा मोठा झालो. हे मैदान माझे आहे”. (Kantara celebration)
बेंगळुरुची खेळपट्टी अवघड होती पण वीस षटके मागे राहून विकेट कशी खेळते हे पाहण्यास मला मदत झाली. चेंडूचा वेग आणि दिशा कशी असते याचे निरीक्षण झाले होते. त्यामुळे मैदानात खेळू शकलो. षटकार कुठे मारायचा हे मी ठरवले होते. विकेट किपिंग करताना बेंगळुरूचे फलंदाज कुठे बाद होता आणि त्यांनी कुठे षटकार मारले याची मला जाणीव झाली होती. माझे झेल सुटल्याने मी भाग्यवान होतो हे सांगण्यासही के.एल राहूल विसरला नाही. (Kantara celebration)
हेही वाचा :