कोल्हापूर : प्रतिनिधी : यजमान बालगोपाल तालीम मंडळाला टायब्रेकरमध्ये ४-२ अशा फरकारने पराभूत करत संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल संघाने चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत प्रवेश करण्याची जुना बुधवार पेठ संघांची पहिलीच वेळ आहे. पूर्णवेळेत सामना २-२ असा बरोबरीत होता. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. अंतिम सामना रविवारी (दि.१३) होणार आहे. (Juna Budhwar in final)
आज शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत बालगोपालचे पारड जड होते. पण जुना बुधवार संघाने विजयश्री खेचून आणली. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला बालगोपालच्या जॉर्ज ओमने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. परतफेड करण्यासाठी जुना बुधवारने आक्रमणे केली. पण बालगोपालने भक्कम बचाव केला. मध्यंत्तरास बालगोपाल १-० असा आघाडीवर होता. (Juna Budhwar in final)
उत्तरार्धात जुना बुधवारने ४३ व्या मिनिटाला गोलची परतफेड केली. त्यांच्या विष्णू मणिकंदनने गोलची नोंद केली. पण जुना बुधवारला परतफेडीचे समाधान टिकवता आले नाही. पुढच्याच ४४ व्या मिनिटाला सागर पोवारने गोल करत बालगोपालला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. पूर्णवेळेत बालगोपालने आघाडी कायम टिकवली. पण जादा वेळेत जुना बुधवारच्या सनवीर सिंगने सफाईदार गोलची नोंद करत सामन्यात खळबळ माजवली. पूर्णवेळेत सामना २-२ बरोबरीत सुटल्यानंतर मुख्य पंचानी टायब्रेकरचा अवलंब केला. (Juna Budhwar in final)
टायब्रेकरमध्ये जुना बुधवारने बाजी मारली. त्यांच्या विष्णू मणीकंदन, तेजस जाधव, रोहित मंडलिक, सनवीर सिंग यांनी पेनल्टी मारल्या. बालगोपालकडून प्रतिक पोवार आणि जॉर्ज कोम पेनल्टी मारल्या. ऋतूराज पाटील आणि प्रथमेश जाधव यांच्या पेनल्टी बाहेर गेल्या. जुना बुधवारने टायब्रेकरमध्ये ४-२ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. (Juna Budhwar in final)
उद्या शनिवारी (दि. १२) स्पर्धेला एक दिवस सुट्टी असून अंतिम सामना रविवारी (दि.१३) खंडोबा तालीम मंडळ आणि संयुक्त जुना बुधवार पेठ यांच्यात होणार आहे. (Juna Budhwar in final)
हेही वाचा :