जयसिंगपूर; प्रतिनिधी : भागीदारीमध्ये केलेल्या व्यवसायात लक्ष देत नसल्याच्या कारणावरून दानोळी (ता.शिरोळ) येथे संतोष शांतिनाथ नाईक (वय ३६ रा.अंबाबाई मंदिर, दानोळी) याचा धारदार शस्त्राने मानेवर व पोटावर वार करून संयशित आरोपी प्रशांत मारूती राऊत (रा.शिवतेज चौक दानोळी) याने खून केला. ही घटना शनिवारी (दि.३०) मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी प्रशांत राऊत याच्याविरोधांत जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून राऊत फरारी झाला आहे. याबाबतची फिर्याद राजेंद्र श्रीधर नाईक यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नाईक व प्रशांत राऊत या दोघांनी प्रासा कार्पेरेशन ही इनपोर्ट- एक्सपोर्टची कंपनी काढली. कंपनीमध्ये नफा मिळत नाही. तसेच मृत संतोष नाईक कंपनीमध्ये लक्ष देत नाही. हा राग मनात धरून शनिवारी (दि.३०) मध्यरात्री गैबी दर्गा साहेब मैदानात संयशित आरोपी प्रशांत राऊतने संतोष नाईक याच्या मानेवर व पोठावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. यानंतर संयशित राऊत फरारी झाला आहे.
घटनेनंतर पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांनी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह पथकांला पाचारण केले. शिवाय पोलिसांनी दानोळी परिसरात प्रशांत राऊत याचा शोध घेतला. मात्र, तो न सापडल्याने जयसिंगपूर पोलिसांनी त्याचा तपासाठी पथके तैनात रवाना केली आहेत. घटनास्थळी श्वान पथकांलाही पाचारण करण्यात आले होते. यावेळी इचलकरंजी डी.वाय.एस.पी. समीरसिंह साळवी, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.