Home » Blog » भर उन्हात शेताच्या बांधावर मनोज जरांगेचे आमरण उपोषण सुरू

भर उन्हात शेताच्या बांधावर मनोज जरांगेचे आमरण उपोषण सुरू

by प्रतिनिधी
0 comments
Jarange's hunger strike is underway on the farm embankment

जालना : मराठा समाजाच्या मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आज शनिवारी सकाळी भर उन्हात अंतरवालीतील शेताच्या बांधावर उपोषणास बसले. यापूर्वीच त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती. उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी महायुतीतील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांनी प्रयत्न केले. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. (Jarange’s hunger strike is underway on the farm embankment)

मनोज जरांगेने यापूर्वी अनेकवेळा उपोषण केले होते. त्यावेळी ते मंडप किंवा तंबू उभारुन उपोषणास बसत. पण यावेळी मात्र त्यांनी विना मंडप भर उन्हात उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक जण त्यांच्यासोबत उन्हात बसले आहेत. सध्या अंतरवाली सराटीत ३५ अंश तापमान असून कोणत्याही आंदोलकाला काहीही झाले तरी त्याला फडणवीस सरकार जबाबदार असतील असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. सरकारने आंदोलन करणाऱ्यावर लाठीमार करु नये असा इशाराही त्यांनी दिले आहे. जरांगेच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काही ठिकाणी रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले आहे. मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण लागू करावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे (Jarange’s hunger strike is underway on the farm embankment)

सरकारच्या शिष्टमंडळाला भेटायचे असेल तर या उन्हात येऊन भेटून चर्चा करावी असे जरांगेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारचे शिष्टमंडळ साडेदहाच्या सुमारास जरांगेंना भेटायला आले आहेत. भेटीसाठी आलेल्या मंत्री विखे पाटलांना जरांगे चर्चेसाठी भर उन्हात बसवले. (Jarange’s hunger strike is underway on the farm embankment)

मनोज जरांगेच्या उपोषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. न्यायलय, कायदा आणि संविधानाच्या चौकटीत बसून आम्ही सर्व निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00