Home » Blog » Srilanka in Test : बांगलादेशची आघाडी दोनशेनजीक

Srilanka in Test : बांगलादेशची आघाडी दोनशेनजीक

by प्रतिनिधी
0 comments
Srilanka

गॉल : बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये शुक्रवारी चौथ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ३ बाद १७७ धावा केल्या. पहिल्या डावातील १० धावांच्या आघाडीमुळे बांगलादेशची आघाडी १८७ धावांपर्यंत पोहोचली आहे. शनिवारी, या कसोटीचा अखेरचा दिवस असल्याने सामना अनिर्णित राहण्याचीच शक्यता अधिक आहे. (Srilanka in Test)

बांगलादेशचा सलामीवीर शादमन इस्लामने दुसऱ्या डावामध्ये १२६ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ७६ धावांची खेळी केली. त्याने कर्णधार नजमुल होसेन शांतोसह तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारीही रचली. शादमन बाद झाल्यानंतर शांतो आणि मुश्फिकूर रहीम या पहिल्या डावातील शतकवीरांनी दिवसअखेरपर्यंत यशस्वीपणे किल्ला लढवला. दिवसाच्या शेवटून दुसऱ्या षटकात शांतोनेही अर्धशतक पूर्ण केले. खेळ थांबला, तेव्हा शांतो ५६, तर रहीम २२ धावांवर खेळत होते. (Srilanka in Test)

तत्पूर्वी, श्रीलंकेचा पहिला डाव ४८५ धावांत संपुष्टात आल्याने बांगलादेशला १० धावांची नाममात्र आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने ४ बाद ३६८ धावा केल्या होत्या. शुक्रवारी कमिंदू मेंडिसने अर्धशतक पूर्ण केले, परंतु त्याचे शतक १३ धावांनी हुकले. त्याने १४८ चेंडूंमध्ये ८ चौकार व एका षटकारासह ८७ धावा केल्या. बांगलादेशकडून नईम हसनने पाच विकेट घेतल्या, तर हसन महमूदने तीन विकेट घेत त्याला पूरक साथ दिली. (Srilanka)

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश – पहिला डाव ४९५ आणि दुसरा डाव – ५७ षटकांत ३ बाद १७७ (शादमन इस्लाम ७६, नजमुल शांतो खेळत आहे ५६, मुश्फिकूर रहीम खेळत आहे २२, प्रबथ जयसूर्या १-४८, मिलन रत्नायके १-१३) विरुद्ध श्रीलंका – पहिला डाव १३१.२ षटकांत सर्वबाद ४८५ (पथुम निसंका १८७, दिनेश चंदिमल ५४, कमिंदू मेंडिस ८७, नईम हसन ५-१२१, हसन महमूद ३-७४).

हेही वाचा :
 भारत इंग्लंड ट्रॉफीचे ‘बारसे’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00