Jagdeep Dhankhar: भारताच्या लोकशाहीवरील क्रूर हल्ला

Jagdeep Dhankhar

Jagdeep Dhankhar

नवी दिल्ली : भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील कथित परकीय हस्तक्षेपाचा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. हा प्रकार “लोकशाहीवरील क्रूर हल्ला” असे ते म्हणाले. या कथित प्रकारात गुंतलेल्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सखोल चौकशी झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. भारत मंडपम येथे मेडिटेशन लीडर्सच्या जागतिक परिषद सुरू आहे. यावेळी बोलताना धनखड यांनी अमेरिकेकडून (यूएसएआयडी) मिळालेल्या निधीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावर मत व्यक्त केले.(Jagdeep Dhankhar)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेले विधान धक्कादायक असल्याचे सांगून धनखड म्हणाले, ‘‘अलीकडेच अमेरिकेने जो खुलासा झाला, तो ऐकून थक्क झालो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी संपूर्ण जबाबदारीने ही बाब उघड केली. या देशातील लोकशाही प्रक्रियेत बदल आणि फेरफार करण्याचा प्रयत्न केला गेला. आपल्या निवडणूक व्यवस्था बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला.’’ (Jagdeep Dhankhar)

धनकड यांनी आपल्या भाषणात कुणाचे नाव घेतले नाही, तथापि त्यांनी निधीचे मूळ शोधून काढण्याची आणि संबंधित व्यक्तींना जबाबदार धरण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, ‘‘मला खात्री आहे की हा प्रकार एखाद्या अधिकाऱ्या व्यक्तीकडून घडला आहे. ही गोष्ट बरोबर आहे, कारण ती वस्तुस्थिती आहे. रक्कम दिली गेली होती, आणि ती छोटी रक्कम नाही. आपण चाणक्याच्या शिकवणीचा अवलंब केला पाहिजे, त्याच्या मुळापर्यंत जायला हवे. ते मुळापासून नष्ट केले पाहिजे.’’ (Jagdeep Dhankhar)

ही वृत्ती मुळापासून नष्ट केली पाहिजे. ते आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे सांगून धनकड म्हणाले, भारताने अशा शक्तींना प्रत्युत्तर दिले पाहिजे. त्यांचा पर्दाफाश होईल हे पाहिले पाहिजे. ते लोक कोण आहेत हे आपण शोधून काढले पाहिजे. आपल्या लोकशाही मूल्यांवर झालेला क्रूर हल्ला आहे. अशा शक्तींना प्रत्युत्तर देणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपण त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे, कारण तेव्हाच भारत आपल्या स्वप्नाच्या शिखरावर पोहोचेल. ‘विकसित भारत’ हे आपले स्वप्न नसून ध्येय आहे, असे धनकड म्हणाले.

यूएसएआयडी निधीद्वारे भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होता, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते. या कथित बाह्य प्रयत्नांवरील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर धनकड यांनी ही टिप्पणी केली.

हेही वाचा :

सावरकरांची ऐतिहासिक उडी खरी की खोटी?

प्रयागराजपुढे आरोग्यसंकट!

Related posts

Rajnath : आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू

Navy lieutenant killed in attack: आठवड्यापूर्वीच लग्न आणि…

Two locals identified: दोघा स्थानिकांच्या मदतीने घडविला हल्ला