jagdeep Dhanakad : पदाच्या लालसेने धनकड यांच्याकडून पक्षपातीपणा

नवी दिल्ली :  

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांना भविष्यातील आणखी चांगल्या पदाची अपेक्षा असल्याचे जाणवते, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. धनकड सभागृहात पक्षपातीपणा करत आहेत. त्यांचे सभागृहातील वर्तन चिंता वाढवणारे आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.  (jagdeep Dhanakad)

विरोधी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करण्याची आणि सरकारची वारंवार प्रशंसा करण्याची धनकड यांची प्रवृत्ती पक्षपाती आहे. १९५२ पासून सभापतींवर अविश्वास ठराव आणण्याची वेळ कधीच आली नव्हती. मात्र सध्याचे सभापतींचे वर्तन पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. आतापर्यंतचे सभापती कधीही राजकारणात गुंतले नव्हते. धनकड पक्षपाती वागत आहेत. सभागृहात ते नियमांपेक्षा राजकारणाला प्राधान्य देत आहेत. त्यांच्यामुळेच सभागृहातील कामकाजात अडथळे येत आहेत, असा आरोपही खर्गे यांनी केला. (jagdeep Dhanakad)

धनकड विरोधी पक्षनेत्यांना लक्ष्य करतात. सभागृहात अनेकदा सरकारचे कौतुक करतात. सभागृहाचा अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या नेत्यांना ते प्रवचन देतात. त्यांना बोलण्यापासून रोखले जाते. एखाद्या मुख्याध्यापकासारखे त्यांचे वर्तन असते, अशी टीका खर्गे यांनी केली.

दरम्यान, धनकड यांच्याविरोधात विरोधकांनी बुधवारीही सभागृहात घोषणाबाजी केली. अविश्वास ठरावासह अन्य मुद्द्यांवर गदारोळ उडाल्याने बुधवारीही राज्यसभेचे कामकाज होऊ शकले नाही.(jagdeep Dhanakad)

साधे बहुमत आवश्य

राज्यसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. तशी नोटीस इंडिया आघाडीने दिली आहे. हा प्रस्ताव आल्यास तो मंजूर होण्यासाठी साधे बहुमत आवश्यक आहे. मात्र २४३ सदस्यांच्या सभागृहात त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नाही. तथापि, ‘संसदीय लोकशाहीसाठी लढण्याचा एक मजबूत संदेश,’ लोकांपर्यंत जाण्यासाठी हा प्रस्ताव आणल्याचे इंडिया आघाडीच्या नेत्यांचे मत आहे.

६० सदस्यांच्या स्वाक्षऱ्या

काँग्रेस, आरजेडी, टीएमसी, सीपीआय, सीपीआय-एम, जेएमएम, आप, डीएमके, समाजवादी पक्षासह ६० विरोधी खासदारांच्या स्वाक्षरी असलेली नोटीस विरोधकांच्यावतीने दिली आहे. राज्यसभेच्या सचिवांकडे काँग्रेस नेते जयराम रमेश आणि नसीर हुसेन यांनी ही नोटीस सादर केली. विशेष म्हणजे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि विविध विरोधी पक्षांचे नेते यांच्या या नोटिसीवर स्वाक्षऱ्या नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

सभागृहातील संख्याबळ

भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे राज्यसभेत १२१ सदस्य आहेत. विरोधी पक्षांचे ८६ सदस्य आहेत. वायएसआरसीपी, बीजेडी, एआयएडीएमके, बीआरएस आणि बसपा यांसारख्या असंलग्न पक्षांचे एकूण २४ सदस्य आहेत.

https://x.com/kharge?ref_src=twsrc%5Egoogle%7Ctwcamp%5Eserp%7Ctwgr%5Eauthor

हेही वाचा :

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे निधन

सोनिया गांधीः चावीची बाहुली ते सरकारचा रिमोट

 

 

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली