Indian lady executed: भारतीय महिलेला अबूधाबीत फाशी

Indian lady executed

Indian lady executed

नवी दिल्ली : बाळाच्या हत्येच्या आरोपात भारतीय महिलेला अबूधाबीमध्ये फाशी देण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) सर्वोच्च न्यायालयाने तिची शिक्षा कायम ठेवली. शहजादी असे या महिलेचे नाव आहे. दरम्यानच्या काळात परराष्ट्र मंत्रालयाने तिला कायदेशीर मदत पुरवली, दया याचिका आणि माफी याचिका करण्यासंदर्भात  तिला मदत करण्यात आली. मात्र फाशीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसे यूएईकडून भारतीय दूतावासाला कळवण्यात आले. त्यानंतर शहजादीच्या कुटुंबीयाला ही माहिती देण्यात आली आहे.(Indian lady executed)

परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी (३ मार्च) सांगितले की संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) २८ फेब्रुवारी रोजी भारतीय दूतावासाला अधिकृतपणे ‘शहजादीला स्थानिक कायद्यांनुसार शिक्षा बजावण्यात आली आहे,’ असे स्पष्ट केले. यूएईच्या सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. भारताकडून दाखल करण्यात आलेली सर्व अपील आणि दया याचिका रद्द ठरवण्यात आल्याय आहेत. (Indian lady executed)

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधित्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) चेतन शर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला शहजादीच्या फाशीची माहिती दिली. भारत सरकार तिच्या कुटुंबाला मदत करत आहे आणि तिच्या अंत्यसंस्काराचे नियोजन ५ मार्च रोजी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या मुलीला दिलेल्या फाशीच्या शिक्षेची बातमी ऐकून वडील शब्बीर कोलमडून गेले. ‘मी शक्य ते प्रयत्न केले, अबूधाबीत जाऊन वकील देण्याइतपत माझ्याकडे पैसे नाहीत. सरकारने आम्हाला पाठिंबा दिला नाही,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. (Indian lady executed)

शब्बीर खान यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परराष्ट्र मंत्रालयाला त्यांच्या मुलीच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची आणि तिच्या कायदेशीर स्थितीबद्दल स्पष्टता मिळविण्याची विनंती केली होती. तथापि, तिच्या फाशीची पुष्टी झाल्यानंतर, न्यायालयाने त्यांची याचिका निकाली काढली.

कोण आहे शहजादी?

उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील ३३ वर्षीय महिला शहजादी डिसेंबर २०२१ पासून अबू धाबीमध्ये एका अमिराती कुटुंबाची काळजीवाहू म्हणून काम करत होती. डिसेंबर २०२२ मध्ये तिच्या देखरेखीखाली असलेल्या एका बाळाच्या मृत्यूमुळे हे प्रकरण पुढे आले. लसीकरणानंतर बाळाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला, मुलाच्या पालकांनी पुढील तपास करण्यास नकार दिला, परंतु फेब्रुवारी २०२३ मध्ये, एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये शहजादीने हत्येची कबुली दिल्याचे दाखवले गेले, परंतु शहजादीच्या कुटुंबीयांच्या मते तिची कबुली जबरदस्तीने मिळवली गेली होती. (Indian lady executed) तिला १० फेब्रुवारी २०२३ रोजी अटक करण्यात आली आणि ३१ जुलै २०२३ रोजी मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तिचे अपील फेटाळण्यात आले आणि २८ फेब्रुवारी २०२४ रोजी न्यायालयाच्या आदेशाने मृत्युदंडाची शिक्षा पुन्हा कायम ठेवली.

हेही वाचा :

 वादग्रस्त ‘रणवीर शो’ला परवानगी, पण…

औरंगजेब उत्तम प्रशासक; अबू आझमींचे वक्तव्य

Related posts

Oppositions support

Oppositions support: कारवाईसाठी सरकारला विरोधकांचा संपूर्ण पाठिंबा

Pak suspended Simla agreement

Pak suspended Simla agreement: पाकिस्ताकडून सिमला करार रद्द

Jewellery theft

Jewellery theft : निवृत्त शिक्षिकेच्या घरातून तीस तोळे दागिने लंपास