India lost : स्मृतीच्या शतकानंतरही भारताचा पराभव

पर्थ : स्मृती मानधनाच्या शतकानंतरही भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ८३ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या ६ बाद २९८ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २१५ धावांत संपुष्टात आला. भारताने सलग तिसऱ्या पराभवासह ही मालिका ०-३ अशी गमावली. (India lost )

ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने जिंकून २-० अशी विजयी आघाडी घेतली होती. भारताकडे बुधवारी तिसरा व अखेरचा सामना जिंकून किमान शेवट गोड करण्याची संधी होती. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाज झटपट बाद झाल्याने सतराव्या षटकात त्यांची अवस्था ४ बाद ७८ अशी झाली होती. तथापि, या वेळी सामन्यावर पकड मिळवण्याची संधी भारताने गमावली. पाचव्या स्थानावरील एनाबेल सथरलँडने शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. तिने ९५ चेंडूंमध्ये ९ चौकार व ४ षटकारांसह ११० धावा फटकावल्या. यादरम्यान, तिने अश्ले गार्डनरसह अर्धशतकी, तर कॅप्टन ताहिला मॅकग्रासोबत शतकी भागीदारीही रचली. गार्डनरने ५०, तर मॅकग्राने नाबाद ५६ धावांची खेळी केली. भारतातर्फे अरुंधती रेड्डीने २६ धावांत ४ विकेट घेतल्या. (India lost )

प्रत्युत्तरादाखल भारताची सुरुवातही अडखळत झाली. पाचव्या षटकात सलामी फलंदाज रिचा घोष अवघ्या २ धावा करून परतली. त्यानंतर, स्मृती आणि हरलीन देओल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचली. हरलीन ३९ धावांवर बाद झाल्यामुळे ही जोडी फुटली. त्यानंतर ठरावीक अंतराने भारताच्या फलंदाज बाद होत राहिल्या. स्मृतीने वन-डे कारकिर्दीतील नववे शतक झळकावून भारताच्या विजयासाठी कसोशीने प्रयत्न केले. पंरतु, तिला अन्य खेळाडूंकडून योग्य साथ लाभली नाही. स्मृतीने एकाकी लढत देत १०९ चेंडूंमध्ये १४ चौकार व एका षटकारासह १०५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून गार्डनरने पाच, तर मेगान शटने २ विकेट घेतल्या. (India lost)

हेही वाचा : 

वेस्ट इंडिजची विजयी आघाडी

रूटला मागे टाकत ब्रुक अव्वलस्थानी

https://www.espncricinfo.com/series/australia-women-vs-india-women-2024-25-1426497/australia-women-vs-india-women-3rd-odi-1426622/full-scorecard

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!