क्वालालंपूर : भारताच्या संघाने पहिल्यावहिल्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या आशिया कप टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात भारताच्या ७ बाद ११७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव ७६ धावांमध्ये संपुष्टात आला. (Asia Cup U-19)
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सलामी फलंदाज गोंगोडी त्रिशाच्या अर्धशतकामुळे भारताला ११७ धावांपर्यंत मजल मारता आली. त्रिशाने ४७ चेंडूंमध्ये ५ चौकार व २ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. अखेरच्या षटकांत मिथिला विनोदने २ चौकार व एका षटकारासह १२ चेंडूंमध्ये १७ धावा फटकावल्या. बांगलादेशतर्फे फरझाना एसमिनने सर्वाधिक ४ विकेट, तर निशिता अख्तर निशीने २ विकेट मिळवल्या.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी ही भारताची जमेची बाजू राहिली. अंतिम सामन्यातही गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताचा विजय सुकर झाला. भारताच्या आयुषी शुक्लाने ३.३ षटकांत १७ धावांमध्ये ३ विकेट घेतल्या. परुणिका सिसोदिया आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी २ विकेटचे योगदान दिले. याबरोबरच महिला गटात वरिष्ठ व एकोणीस वर्षांखालील अशा दोन्ही आशिया कप स्पर्धांचे विजेतेपद जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. (Asia Cup U-19)
𝗖.𝗛.𝗔.𝗠.𝗣.𝗜.𝗢.𝗡.𝗦 🏆
India Women U19 are the inaugural winners of the #ACCWomensU19AsiaCup 👏
Scoreboard ▶️ https://t.co/uREtAlBiiq#TeamIndia | #ACC | #Final pic.twitter.com/D1R6z6nENY
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
हेही वाचा :