भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत दोनदा ‘बत्ती गुल’

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अॅडलेड स्टेडियमवर एक विचित्र घटना क्रिकेट चाहत्यांना अनुभवायला मिळाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या १८ व्या षटकात स्टेडियमवर दोनदा वीज गेली. यामुळे सामने काही काळ थांबवण्यात आला. या घटनेमुळे भारताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा मात्र नाराज झाला. (IND vs AUS Test)

भारतीय वेळेनुसार दुपारी ३.५२ वाजता पहिल्यांदा स्टेडियमवर लाईट गेली. ती दोन मिनिटांनी म्हणजे ३.५४ वाजता परत आली. यानंतर दुपारी ३.५५ वाजता पुन्हा वीज गेली आणि काही मिनिटांनी पुन्हा सुरू झाली. याचा परिणाम खेळावर झाला. घटनेमुळे सामन्यात व्यत्यय आला. यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू नाराज झाले.

सामन्यात समालोचन करणारे समालोचकही याविषयी बोलण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. समालोचक म्हणाले की, ‘कुणीतरी स्टेडियमवरील पॉवर स्विच बंद केल्याचे दिसत आहे.’ दोनवेळा वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रेक्षकही हैराण झाले.

सामन्यासाठी चाहत्यांची गर्दी

ॲडलेड स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या कसोटी सामना पाहण्यासाठी अनेक क्रिकेट चाहत्यांनी गर्दी केली होती. याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, पहिल्या दिवशी एकूण ३६,२२५ चाहते डे-नाईट कसोटी पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. (IND vs AUS Test)

पहिल्या दिवसाचा खेळ

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा पहिला डाव केवळ १८० धावांत आटोपला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात १ बाद ८६ धावा केल्या. उस्मान ख्वाजा (१३) रूपात ऑस्ट्रेलियाचा पहिला फलंदाज बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने रोहित शर्माकरवी झेलबाद केले. सध्या मार्नस लॅबुशेन (२०) आणि नॅथन मॅकस्विनी (३८) खेळत आहेत. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली आहे. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही ९४ धावांनी पिछाडीवर आहे.

हेही वाचा :

Related posts

Modi Letter : ‘तुझी निवृत्ती जणू कॅरम बॉल’

England Cricket : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर!

‌Team India Practice : रोहित, आकाशदीपला किरकोळ दुखापत