महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाच्या वतीने सरकार विरोधात निदर्शने केली जात आहेत. सलग दोन दिवस आंदोलन सुरू असल्याने इस्लामबाद मध्ये तणावाचे वातावरण आहे. निदर्शने व अशांततेच्या परिस्थितीमुळे रावळपिंडी व इस्लामाबाद मध्ये काही ठिकाणी मोबाईल फोन ची सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान,जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या आहेत. (Imran Khan)
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा आदेश येई पर्यंत आंदोलन सुरू राहील तसेच खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांना अटक केल्यास पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम स्वाती आंदोलनाचे नेतृत्व करतील, असेही तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने स्पष्ट केले आहे.
आंदोलन सुरूच राहील
माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तान सरकारने विविध आरोपांखाली ५ ऑगस्ट २०२३ रोजी अटक केली होती. काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे. सध्या ते रावळपिंडी येथील आदिलाला कारागृहात आहेत. इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसह न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य आणि वाढत्या महागाईचा निषेध करणे यासाठी हे शनिवारपासून सरकारविरोधातील आंदोलन सुरु झाले आहे. (Imran Khan)
हेही वाचा :