‘सा.रें.’च्या विचारांचा मीच वारसदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा दावा

जयसिंगपूर; प्रतिनिधी : दिवंगत सा. रे. पाटील यांनी मला राजकीय आणि सामाजिक विचारांचा वारसदार म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझी राजकीय घोडदौड सुरू आहे. तालुक्यामध्ये २ हजार  कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत, तथापि जांभळीतील मराठा मंडळाचे सभागृह राजकीय हेवेदाव्यांमुळे रखडले आहे, अशी खंत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जांभळी येथे व्यक्त केले.

ते म्हणाले, राजकारणावेळी राजकारण जरूर असावे. मात्र, विकास कामांसाठी येथील ग्रामपंचायत ठराव देत असताना काम होऊच नये, अशा आशयाचा ठराव देतात, अशा राजकारणाला काय म्हणायचे? मी या गावचा रहिवाशी नाही, अशी ओरड सुरू आहे. जांभळी व यड्राव गावचे ऋणानुबंध अतूट आहे. दिवंगत शामरावअण्णा पाटील यांचे या गावावर विशेष लक्ष होते. मी आणलेला कोट्यवधींचा निधी माझ्या खिशातून आलेला नाही. तर जनतेच्या करातून जमा झालेला आहे.

यापुढेही विकास निधी मोठ्या प्रमाणात घेऊन जांभळी गावाचा चेहरा मोहरा बदलणार, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. यावेळी बाबगोंडा पाटील, चंद्रकांत मोरे, प्रकाश पाटील टाकवडेकर, अभिजीत जगदाळे, पोपट पुजारी, मुकुंद गावडे, कुलदीप पाटील, यड्रावचे सरपंच कुणालसिंह निंबाळकर सरकार, प्रमोद पाटील, तायाप्पा कांबळे, सुनील मोरे, संदीप चव्हाण, विकास शिंदे, सुखदेव गायकवाड आदी उपस्थित होते.

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी