हिंजवडी मेट्रोचे काम चार महिन्यांत पूर्ण होणार

पुणे : प्रतिनिधी :  हेल्मेट सक्ती, पोलिसांची वाढती गस्त, वाहतूक कोंडी यासारख्या अनेक गोष्टींमुळे सतत चर्चेत असलेल्या पुणेकरांना आगामी चार महिन्यानंतर दिलासा मिळणार आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे ७४ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग शिवाजीनगर, बाणेर, बालेवाडी आणि हिंजवडीला जोडतो. मार्चअखेर हा प्रकल्प पूर्ण होणार असून, त्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानचा हा २३.२ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग ८३१२ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या प्रोजेक्टचे काम सुरू असून तो वेळेत पूर्ण होणार आहे. मेट्रोच्या या मार्गिकेमुळे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या म्हणजेच आयटी वर्कर्सला मोठा दिलासा मिळणार आहे. रोजच्या वाहतूक कोंडीमधून या कर्मचाऱ्यांची सुटका होणार असून मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मेट्रोचा हा मार्ग बऱ्याच रहिवाशी भागांबरोबरच वाणिज्य भागांमधून जात असल्याने यामुळे अनेकांची सोय होणार आहेत. बाणेर, बालेवाडी आणि हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे येथे रोज सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडीची मोठी समस्या जाणवते. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ऑफिसला पोहचल्यानंतर सायंकाळी पुन्हा हीच कसरत करावी लागते. म्हणूनच या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ डिसेंबर २०१८ रोजी या मेट्रो मार्गाची पायाभरणी केली होती. बालेवाडी, बाणेर आणि हिंजवडीमधील रहिवाशांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने ही मेट्रो या परिसराच्या भरभराटीसाठी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी वरदान ठरणार आहे. या प्रकल्पातील आर्थिक तरतुदीमधून जे उद्देश समोर होते, त्यापैकी ६३ टक्के उद्देश साध्य करण्यात आले आहे.

‘या प्रकल्पाचे एकूण ७४ टक्क्यांहून अधिक काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळेच हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होऊन मार्च २०२५ मध्ये ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काम सुरू झाल्यानंतर साडेसहा वर्षात ही मेट्रो धावणार आहे.

– रैनज पठाण, मुख्य अभियंते, पीएमआरडीए

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ