हरियाणातील विजयानंतर भाजपचा कोल्हापूरात जल्लोष

कोल्हापूर; प्रतिनिधी :  हरियाणा विधानसभा निवडणूकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून हॅटट्रीक साधल्यानंतर कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा केला. भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि साखर पेढे वाटून जल्लोष केला.

भाजप कार्यकर्त्यांनी जयघोष करून शिवाजी चौक दणाणून सोडला. यावेळी बोलताना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे म्हणाले, हरियाणा मधील विजय हा देशांमध्ये आजही सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांचा, तरुणांचा सर्वांचा मोदीजींवरील विश्वास स्पष्ट करत आहे. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पाटील यांनी संपूर्ण देश आणि देशातील जनता ही भाजपाच्या पाठीशी आहे असे मत व्यक्त केले.

जिल्हा सरचिटणीस डॉ राजवर्धन यांनी देशातील लोकसभेनंतर सुद्धा विरोधी पक्षांनी हरियाणामध्ये पसरविलेले अनेक नॅरिटिव्ह या निकालाने तेथील जनतेने खोटे असल्याचे सिद्ध केले व जनता भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी विराज चिखलीकर, अमर साठे, संगीता तांबे, सुरेश गुजर, महेश यादव, विशाल शिराळकर, अप्पा लाड, सयाजी आळवेकर, किरण नकाते, दिलीप बोंद्रे, सागर रांगोळे, धीरज पाटील, गिरीष साळोखे, रविकिरण गवळी, अजित सुर्यवंशी, सिद्धू पिसे, संतोष माळी, राजेंद्र वडगांवकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Related posts

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

कोल्हापूरात अमित शहांच्या निषेधार्थ इंडिया आघाडी एकवटली

सोशल मीडियावर लाईव्ह करत तरुणाची पंचगंगेत उडी