Hands Off : ‘हॅन्डस् ऑफ’ रॅलीत हजारो अमेरिकेन रस्त्यांवर

Hands Off

Hands Off

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क् यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यांवर उतरुन निदर्शने करत आहेत. सार्वजनिक सेवांमध्ये कपात आणि वादग्रस्त  सामाजिक धोरणावरुन लोक निषेध करत आहेत. अमेरिकेतील ५० राज्यामध्ये १२०० ‘हॅन्डस ऑफ रॅली’ काढण्यात आला. रॅलीमध्य नागरी हक्क समर्थक, कामगार संघटना, एलजीबीटीक्यू प्लस गट, आणि अन्य संघटना सहभागी झाल्या आहेत. संघराज्य सरकारच्या अक्रमक पुनर्बांधणीला थांबवावी अशी मागणी निदर्शकांकडून केली जात आहे. (Hands Off)

‘हॅन्डस् ऑफ रॅली’  वॉशिग्टंन डीसीमधील नॅशनल मॉल, सर्व राज्यांच्या राजधानी, न्यूयॉर्क, लॉज एंजिल्ससह अन्य मोठ्या शहरात निघाल्या आहेत. एएफपी वृत्तसंसथेने दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांनी ट्रम्प प्रशासनावर लोकशाही संस्थांना उद्धवस्त करण्याचा आरोप केला आहे. वॉशिग्टंन डीसीमध्ये झालेल्या सभेत ग्रेलन हॅगलर यांनी “त्यांनी झोपलेल्या राक्षसाला जागे केले आहे आणि त्यांना अजून काहीही दिसलेले नाही” असे ते म्हणाले. (Hands Off)

टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स चे सीईओ एलॉन मस्क हे नव्याने स्थापन केलेल्या सरकार त्यांना सरकारी कार्यक्षमता विभागचे प्रमुख केले आहे. त्यांनी सरकारी खर्चात कमी करण्यासाठी मोठे निर्णय घेतले असून अनेक लोकोपयोगी काम करणाऱ्या सामाजिक संस्थामधील  कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. मस्क यांनी त्यांनी राबवलेल्या धोरणाचे समर्थन केले असून आपल्या प्रयत्नामुळे करदात्यांना अब्जावधी रुपयांची बचत होत आहे असा दावा केला आहे. पण अशा संस्थामध्ये कपात करन अत्यावश्यक सेवा बंद करण्यासारखे आहे असे अनेक अमेरिकन नागरिकांचे म्हणणे आहे. (Hands Off)

सामाजिक सुरक्षा कार्यालये बंद करणे, संघीय कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात काढून टाकणे आणि आरोग्यसेवा आणि एचयआयव्ही निधीमध्ये कपात करणाऱ्या मस्क यांच्या धोरणांवर ‘हॅन्डस ऑफ’ मध्ये सहभागी झालेल्या निदर्शकांनी टीका केली आहे. निदर्शकांनी हातात फलक झळकावत ट्रम्प आणि मस्क यांचा निषेध केला आहे. न्यूयॉक आणि मॅनहॅटनमध्ये निदर्शकांनी ‘हॅन्डस ऑफ अवर डेमॉक्रॉसी’, ‘डिव्हर्सिटी इक्विटी इन्युलजन मेक्स अमेरिका स्ट्रॉग’ असे लिहिलेले फलक घेऊन मोर्चा काढला आहे. (Hands Off)

अमेरिकेच्या सीमेपलीकडेही निदर्शने गेली आहेत. ट्रम्प यांच्या जागतिक परिणामाबद्दल चिंता व्यकत करत लंडन आणि बर्लिनसारख्या युरोपियन शहरांमध्ये निदर्शक जमले आहेत. लंडनमधील अमेरिका ब्रिटन दुहेरी नागरिकत्व असलेल्या लिझ चेंबरलिन म्हणाल्या, हा आर्थिक वेडेपणा आहे. तो आपल्याला जागतिक मंदीमध्ये ढकलत आहे. (Hands Off)

अमेरिकते मोठ्या संख्येने निदर्शने होत असतानाही व्हाईट हाऊसने अशांतता फेटाळून लावली आहे. ट्रम्प पात्र अमेरिकन लोकांसाठी सामाजिक सुरक्षा, मेडिकेअर, आणि मेडिकेडचे सरंक्षण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. एपी ने दिलेल्या निवेदनात, प्रशासनाने असा दावा केला आहे की “डेमोक्रॅट हे फायदे कागदपत्र नसलेल्या स्थलांतरितांना देऊ इच्छितात, ज्यामुळे “या कार्यक्रमांमुळे दिवाळखोरी होईल आणि अमेरिकन ज्येष्ठांना चिरडले जाईल”. माजी रेगन रिपब्लिकन,६६ वर्षीय रॉजर ब्रूम सारख्या निदर्शकांनी गंभीर चिंता व्यक्त केली. (Hands Off)

हेही वाचा :

आयुक्तांनी स्वत:च्या डोक्यात झाडली गोळी

भारत-श्रीलंकेदरम्यान संरक्षण करार

Related posts

Dhanakad Criticized SC

Dhanakad Criticized SC: राष्ट्रपतींना निर्देश देण्याचा अधिकार न्यायपालिकेला नाही

Abhishek Sharma

Abhishek Sharma : ‘ऑरेंज आर्मी, हे तुमच्यासाठी!’

Tulsi revealed evm flaws

Tulsi revealed evm flaws: ईव्हीएम हॅक करता येते