G. Praveen:भारतीय विद्यार्थ्याची अमेरिकेत हत्या

G. Praveen

विस्कॉन्सिन : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. जी. प्रवीण (वय २७) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील आहे. शिक्षण पूर्ण करून तो चारच महिन्यांत परत येणार होता.( G. Praveen)

प्रवीण हा विस्कॉन्सिनमधील मिलवॉकी येथे उच्च शिक्षणासाठी गेला होता. शिक्षणाबरोबरच तो एका दुकानात पार्टटाइम कामही करत होता. याच दुकानावर अज्ञात हल्लेखोरांनी दरोडा टाकला. त्यावेळी हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात प्रवीणचा मृत्यू झाला. बुधवारी (५ मार्च) सकाळी ही घटना घडली. याबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांनी याबाबत मुलाच्या वडिलांना माहिती दिली.

प्रवीणने डेटा सायन्समधून पदवीचे शिक्षण घेतले होते. त्यांनतर २०२३ मध्ये तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. जानेवारी महिन्यात तो भारतात आला होता. त्याचा कोर्स संपण्यास केवळ चार महिने बाकी होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अमेरिकेतच नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याआधीच त्याची हत्या करण्यात आली, अशी मन सुन्न करणारी प्रतिक्रिया प्रवीणचे वडील राघवुलू यांनी दिली. (G. Praveen)

त्यांनी सांगितले की, सकाळी ५ वजाता प्रवीणचा व्हॉट्सअप कॉल आला होता. कामात असल्याने उचलू शकलो नाही. मिस्ड कॉल पाहिल्यानंतर त्याला व्हाईस मेसेज पाठवला. तासाभरानंतरही त्याचा कॉल आला नाही. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या नंबरवर कॉल केला, मात्र संपर्क झाला नाही. काहीतरी घडले असावे असा संशय आल्याने मी कॉल कट केला. आम्ही त्याच्या मित्रांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रवीणची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (G. Praveen)

‘‘प्रवीणवर हल्लेखोरांनी बंदुकीने गोळी झाडल्याची माहिती पोलिसांनी आम्हाला दिली. सुरुवातीला त्यांनी ती खाजगी वापरातील बंदूक होती, असे सांगितले. नंतर दुकानातील बंदूक होती असे सांगितले. पोलिसांनी ही घटना समुद्रकिनाऱ्याजवळ घडली असे सांगितले. आम्हाला पाठवलेल्या एफआयआरमध्ये मात्र त्यांनी ही घटना एका दुकानात घडल्याचा उल्लेख आहे,’’ असे मित्रांनी सांगितल्याचे वडीलांनी सांगितले. (G. Praveen)

हेही वाचा :

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्यावर लंडनमध्ये हल्ल्याचा प्रयत्न

Related posts

Babasaheb Ambedkar: बाबासाहेबांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान

Royal Challengers : बेंगळुरू पुन्हा विजयपथावर

Archery Gold : भारताला तिरंदाजीत सुवर्ण