पेट्शी फ्रेंडशीप

कुत्रा सुंदर आणि स्नेहाळ प्राणी आहे.  माणसाप्रति तो विश्वासू आणि निष्ठावान असतो. त्याच्याजागी उपजतच खेळकरवृत्ती आणि प्रेमभावना असते. पाळीव कुत्र्यांसोबत काही वेळ घालवण्यामुळे शारीरिक आणि मानसिक फायदेही मिळतात, असे अभ्यासात दिसून आले आहे. त्यामुळे कुत्रा मित्र तर आहेच शिवाय तो आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. साहजिकच पेट्शी फ्रेंडशीप फायद्याची ठरते, असे म्हणता येईल.

पाळीव कुत्र्यासोबतच्या शारीरिक हालचाली आणि त्यांचे सोशल असणे मालकांसाठी फायदेशीर ठरते. मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. त्यामुळे अकाली मृत्यूचा धोका कमी होतो, असे स्वीडनमध्ये झालेल्या अभ्यासात दिसून आले आहे. तर अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या अभ्यासानुसार, कुत्र्यासोबत दंगामस्तीत वेळ घालवण्याने हृदयाचे आरोग्यासाठी चांगले राहते. त्याच्या पालनपोषणात वेळ घालवता येत असल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकून राहते. त्यामुळे मालकाला दीर्घायुष्याचा आनंद घेता येतो. एकटेपणातील कंटाळवाणा घालवता येतो.

कुत्रा असलेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात कुत्र्याच्या मालकांना हृदयविकाराने मृत्यूचा धोका २४ टक्के कमी असतो, असे अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. कुत्र्यासोबत काही वेळ घालवल्याने मालकाच्या हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. पाळीव कुत्र्यासोबत खेळल्याने रक्तदाब आणि उष्मा दर कमी होतो. स्नायूंना आराम मिळतो. जर्नल सर्कुलेशन : कार्डिओव्हस्कुलर क्वालिटी अँड आउटकम्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, संशोधकांना असे आढळून आले की, कुत्रा नसलेल्या मालकांच्या तुलनेत एकटे राहत असलेल्या आणि हृदयविकाराचा झटक्यातून वाचलेल्यांना मृत्यूचा धोका कमी होता. त्यांच्या तणाव कमी होता. त्यामुळे कुत्रा पाळणे हा आनंददायी अनुभव असू शकतो.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सर्वेक्षणात असेही आढळून आले, की शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्तीचा विचार केला तर कुत्रा असलेल्यांपैकी ९५ टक्के लोक तणावमुक्तीसाठी त्यांच्या या पाळीव प्राण्यांवर अवलंबून असतात. ते कुत्र्याला नियमीत फिरायला घेऊन जातात, त्यामुळे त्यांचा व्यायाम चांगला होतो. वजन आटोपशीर राहते, रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. कुत्रा हा अधिक संवेदनशील आणि सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे त्याच्याशी संवाद वाढला तर तो तुमच्याशी अधिक प्रेमाने वागतो. त्यामुळे माणसाची चिंता आणि नैराश्याची भावना कमी होते.

Related posts

पोटातले ओठावर!

हिंदुदुर्ग!

Lok Sabha : खेळपट्टी खराब करण्याचा संसदीय खेळ