Football players clashed : मैदानावरच फुटबॉल खेळाडूंच्यात राडा

Football players clashed

Football players clashed

कोल्हापूर : प्रतिनिधी :  उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच राडा झाला. दोन्ही संघांतील खेळाडूंनी एकमेकांच्या अंगावर धाऊन जात अर्वाच्च शिविगाळ, लाथा बुक्क्या मारुन मारामारी केल्याचे चित्र पहायला मिळाले. या घटनेने कोल्हापूरच्या फुटबॉलला गालबोल लागल्याची भावना फुटबॉल शौकिनांनी व्यक्त केली. मैदानावर राडा करणाऱ्या पाटाकडीलच्या सहा तर शिवाजी संघाच्या पाच अशा अकरा खेळाडूंना रेड कार्ड दाखवण्यात आले. (Football players clashed)

दरम्यान या सामन्यात पाटाकडील संघाने शिवाजी संघाचा २-० असा पराभव करत विजेतेपद पटकावले. या हंगामात सलग तीन विजेतेपद पटकावत पाटाकडील संघाने विजेतेपदाची हॅटट्रीक साजरी केली. विजेत्या संघाला एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. (Football players clashed)

दुसऱ्याच मिनिटाला पाटाकडीलचा गोल

पाटाकडील आणि शिवाजी या संघात चुरशीचा सामना होणार असल्याने गुढीपाडवा सण असूनही मैदान खचाखच भरले होते. दोन्ही संघांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. पूर्वार्धात दुसऱ्याच मिनिटाला प्रथमेश हेरेकरने गोल करत पाटाकडील संघास आघाडी मिळवून दिली. बरोबरी साधण्यासाठी शिवाजी संघाने आक्रमक चढाया केल्या. पण पाटाकडीलने भक्कम बचाव ठेवला. मध्यंत्तरास पाटाकडील संघ १-० अशी आघाडी मिळवली होती. (Football players clashed)

उत्तरार्धात पाटाकडीलचा दुसरा गोल

उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी शिवाजी संघ मैदानात उतरला. पण पाटाकडीलने आक्रमक धोरण स्वीकारात शिवाजी संघाच्या गोलक्षेत्रात खोलवर चढाया केल्या. ६० व्या मिनिटाला पाटकाडील अंशीमने गोल करत पाटाकडीलला भक्कम स्थितीत नेले. (Football players clashed)

मैदानावर राड्यास सुरूवात

दोन गोलच्या आघाडीनंतर पाटाकडील संघाच्या ओंकार मोरे आणि शिवाजी संघाच्या संकेत साळोखे यांच्यात चेंडूवर ताबा घेण्यावर चढाओढ लागली. त्यामध्ये दोघांनी एकमेकांना खुन्नस दिली. त्यातून संकेत साळोखेने ओंकार मोरेच्या तोंडावर जोरदार ठोसा मारला. त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांच्या अंगावर धाऊन गेले. मुख्य पंच आणि साईड पंचांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही संघातील खेळाडूंनी अर्वाच्च शिविगाळ करत लाथा बुक्क्यांनी हाणामारी सुरू केली. राखीवर खेळाडूही मैदानात आले. त्यांनी मारामारी सुरू केली. अखेर मैदानावर पोलिस आले. पोलिसांनी लाठी उगारताच गोंधळ बंद झाला. (Football players clashed)

पंचांनी अकरा खेळाडूंना रेड कार्ड दाखवले.

मैदानावर राडा करणाऱ्या अकरा खेळाडूंना मुख्य पंचांनी रेडकार्ड दाखवले. शिवाजीच्या करण चव्हाण बंदरे, सुयश हांडे, विशाल पाटील, संकेत साळोखे, अमन सय्यद तर पाटाकडीलच्या ऋतुराज सूर्यवंशी, जय कामत, यश देवणे, ऋषिकेश मेथे पाटील, रोहित पोवार, ओंकार मोरे अशी रेडकार्ड दाखवणाऱ्या खेळाडूंची नावे आहेत. रेडकार्ड दाखवल्याने त्यांना मैदान सोडावे लागले. (Football players clashed)

दोन्ही संघातील प्रत्येकी सात खेळाडूंमध्ये सामना

प्रत्यक्ष मैदानावर खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या प्रत्येकी चार खेळाडूंना रेड कार्ड दाखवल्याने दोन्ही संघात फक्त प्रत्येकी सात खेळाडू होते. दोन्ही संघाच्या एकूण १४ खेळाडूंमध्ये अंतिम सामन्यात शेवटची दहा मिनिटे सामना खेळवण्यात आला. त्यामध्ये पाटाकडीलने बचाव ठेवत गोल होऊ दिला नाही. दोन गोलची आघाडी कायम टिकवत पाटाकडीलने सामना जिंकला. (Football players clashed)

विजेत्या संघाला एक लाखाचे बक्षिस

विजेत्या पाटाकडील संघास उत्तरेश्वर चषक आणि एक लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले. बक्षिस वितरण राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि माजी आमदार केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  यावेळी माजी नगरसेवक सत्यजीत कदम, तेज घाटगे, हर्षल सुर्वे, दीपक बराले आदी उपस्थित होते. (Football players clashed)

हेही वाचा :  

दिल्लीचा सलग दुसरा विजय

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबरमध्ये

Related posts

32 burglaries solved : तीन चोरट्यांकडून ३२ घरफोड्या

Eknath shinde’s assistance: काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत

Barcelona : बर्सिलोना विरुद्ध रियल मद्रिद