मुंबई : प्रतिनिधी : आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन उर्वरीत सामन्यात खेळण्याची शक्यता कमी झाली आहे. सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध झालेल्या सामन्यात डाव्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. वेगवान गोलंदाजीच प्रशिक्षक जेम्स होप्स यांनी फर्ग्युसन अनिश्चित काळासाठी खेळणार नसल्याबाबत पुष्टी दिली आहे. फर्ग्युसनच्या बदली आता संघ झेवियर बार्टलेट, अझमतुल्लाह उमरझाई, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर या बदली खेळाडूंचा विचार करण्याची शक्यता आली. (Ferguson)
कोलकोता नाईट रायटर्सविरुद्ध पंजाबचे गोलंदाज प्रशिक्षक होप्स म्हणाले, फर्ग्युसनला गंभीर दुखापत झाली. तो अनिश्चित काळासाठी बाहेर जाण्याची शक्यता आले. या स्पर्धेत तो पुन्हा खेळण्याची शक्यता धुसर झाली आहे. (Ferguson)
सनरायर्झस हैद्राबाद संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात फर्ग्युसनने फक्त दोन चेंडू टाकले. डाव्या पायाने तो लंगडत मैदानाच्या बाहेर गेला. संघाने त्याच्या दुखापतीचे कारण स्पष्ट केले नसले तरी त्याच्या स्नायूला मोठी दुखापत झाल्याची शक्यता आहे. ३३ वर्षाचा न्यूझिलंडचा खेळाडू फर्ग्युसन पंजाबसाठी मधल्या षटकांमध्ये महत्वाची भूमिका बजावत होता. त्याने या हंगामात चार सामन्यात पाच बळी मिळवले आहेत. त्याच्या अनुपस्थितीमुळे संघामध्ये वेगवान गोलंदाजीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पंजाबने पाच सामन्यात तीन विजय मिळवले असून दोन पराभव झाले आहेत. टीम टॉपवर पोचण्यासाठी त्यांना वेगवान गोलंदाजीची गरज भासणार आहे. (Ferguson)
हेही वाचा :