डेहराडूनमध्ये कारचा भीषण अपघात; सहा ठार, एक गंभीर

डेहराडून; वृत्तसंस्था : डेहराडूनमध्ये काल (दि.११) रात्री उशिरा मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात कार अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डेहराडूनचे शहर पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार यांनी एएनआयल्या दिलेल्या माहितीनुसार काल रात्री उशिरा २ वाजता ओएनजीसी चौकाजवळ हा अपघात झाला. अपघातात चारचाकी वाहनाला धडक देणाऱ्या कंटेनरच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन युवक आणि तीन युवतींचा समावेश आहे. ही धडक एतकी भीषण होती की, कंटेनरने धडक दिलेल्या कारचा चक्काचूर झाला आहे. चारचाकी वाहनातून सात मुले आणि मुली फिरण्यासाठी निघाले होते.

सर्व मृत २५ वर्षाखालील

चारचाकी वाहनातून प्रवास करणारे सर्व युवक आणि युवती २५ वर्षाखालील होते. गुनीत सिंह (वय १९), कामाक्षी सिंघल (२०) आणि नव्या गोयल (२३) अशी मृत ३ मुलींची नावे आहेत. तिन्ही मुली डेहराडून येथील राहणाऱ्या आहेत. तर कुणाल कुरेजा (२३), ऋषभ जैन (२४), अतुल अग्रवाल (२४) अशी मृत मुलांची नावे आहेत. यातील कुणाल कुकरेजा हा हिमाचल प्रदेशातील चंबा येथील रहिवासी आहे. कंटेनरच्या धडकेनंतर कार झाडाला जाऊन आदळल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

Related posts

Python near Hostel: शंभर किलो अजगराचा गर्ल्स होस्टेलजवळ डेरा

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित