Farmer’s suicide : विष पिऊन आंदोलक शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer's suicide

नवी दिल्ली : शंभू सीमेवर एका ५५ वर्षीय आंदोलक शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. आंदोलनस्थळी तीन आठवड्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. रेशम सिंग असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Farmer’s suicide)

विष प्यायल्याचे लक्षात येताच त्यांना पतियाळा येथील राजिंद्र रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

आंदोलक शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकार पुरेशा गांभीर्याने पाहत नाही. सातत्याने आंदोलन करूनही सरकार साधी चर्चा करण्याची तयारीही दाखवत नाही. त्यामुळे रेशम सिंग यांच्या मनात खदखद आणि नाराजी होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी.(Farmer’s suicide)

यापूर्वी, १८ डिसेंबर रोजी संभू सीमेवर आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. रणजोध सिंह असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. खनौरी येथे २६ नोव्हेंबरपासून शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल उपोषण करीत आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने व्यथित झालेल्या रणजोध सिंग यांनी आत्महत्या केली. संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली १३ फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत.

हेही वाचा : 

नऊ संघस्वयंसेवकांना का झाली जन्मठेप?

Related posts

Mislead by G Map: गुगल मॅपमुळे पोलीस झाले ‘दरोडेखोर’

Patient Suicide : लाभ नाकारला; कॅन्सर रुग्णाची आत्महत्या

Los angeles wildfires : अग्नितांडव; तीन लाखांवर लोक ‘बेघर’