मुंबई : प्रतिनिधी : मुंबईत मनसे आणि ठाकरे व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षांची ताकद नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणूकीतही मुंबईत सर्वात मोठा पक्ष भाजप होता, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारला. (Fadnavis’ attack on Raj Thackeray)
आगामी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन जोरात सुरू आहे. राज ठाकरे यांनी मुंबईत मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुंबईत फक्त दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्षच मजबूत आहेत. दुसऱ्या पक्षांची मुंबईत जास्त ताकद नाही. राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर त्यामध्ये मला हरकत घेण्याचे कारण नाही, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. (Fadnavis’ attack on Raj Thackeray)
फडणवीस म्हणाले, २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत मुंबईत सर्वात मोठा पक्ष भाजप होता. पण कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर त्यामध्ये काहीही हरकत घेण्याचे कारण नाही. प्रत्येकाला आपल्या पक्षाला मोठे म्हणण्याचे अधिकार आहे. अशी खोचक टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. (Fadnavis’ attack on Raj Thackeray)