Home » Blog » अमेरिकेचे व्हेनेझुएलावर हवाई हल्ले

अमेरिकेचे व्हेनेझुएलावर हवाई हल्ले

by प्रतिनिधी
0 comments
US airstrikes on Venezuela

नवी दिल्ली :  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर मोठा हल्ला केला आहे अशी घोषणा केली आहे. व्हेनेझुएलाचे नेते निकोलर मादुरो कुटुंबासह देशाबाहेर पळाले असल्याचा दावा केला आहे.

व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये अमेरिकेच्या लष्काराने हल्ले केले आहेत. कराकसमध्ये किमान सात स्फोट झाल्याची नोंद झाली आहे. हल्ल्यानंतर नागरिक रस्त्यांवरुन धावत सुटले आणि त्यांनी सुरक्षितस्थळी आश्रय घेतला. लष्करी तळावरील हल्ल्यामुळे धुराचे साम्राज पसरले होते. राजधानीच्या काही भागात वीजही गेली आहे. (US airstrikes on Venezuela)

व्हेनोझुएलावर अमेरिकेने दहशतवाद आणि ड्रग तस्करीचे आरोप केले होते. व्हेनेझुएलाचे सत्ताधीश मादुरोच्या अटकेवर ५० दशलक्ष डॉलर्स बक्षिस घोषित केले होते. ट्रम्प सत्तेवर आल्यावर व्हेनेझुएलावर कारवाईसाठी प्रशासन आणि सैन्यावर दबाव वाढत होता. व्हेनेझुएलावर हल्ला केला असला तरी देशातील मोठ्या भागावर सशस्त्र गट, गुन्हेगारी टोळ्या, कोलंबियन गनिमी गट आणि ड्रग्ज तस्करीचे मोठे नेटवर्क कार्यरत आहे. अमेरिकेने हल्ला केला असला तरी हे नेटवर्क ताबडतोब उद्धवस्त होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जाते. जर मादुरोला देश सोडून गेला असेल तर मारिया कोरिना मचाडे किंवा २०२४ च्या निवडणुकीतील विरोधी उमेदवार एडमंडो गोंझालेझला सत्ता मिळू शकते असा राजकीय तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त केला जात आहे. (US airstrikes on Venezuela)

व्हेनेझुएलासोबत अमेरिकेचा संघर्ष वाढवल्यानंतर, आक्रमक लष्करी आणि गुप्तचर मोहीम सुरू केल्यानंतर सध्याचा हल्ला करण्यात आला आहे.  ड्रग्ज कार्टेल्सना लक्ष्य करण्यात आले आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासून, अमेरिकन सैन्याने कॅरिबियन आणि पूर्व पॅसिफिकमध्ये अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप असलेल्या जहाजांवर सतत हल्ले केले आहेत.  ३५ हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक लोक मारले गेले आहेत. लष्कराची उभारणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. युद्धनौका, पाणबुड्या, लढाऊ विमाने आणि अखेरीस, विमानवाहू युद्धनौका यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड या प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे सुमारे १२,००० अमेरिकन जवान जवळच्या सम्रुदी तळावर पोहोचले आहेत. (US airstrikes on Venezuela)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00