Home » Blog » Four judges appointed : सर्किट बेंचमधील कामकाजासाठी  चार न्यायाधीशांची नियुक्ती

Four judges appointed : सर्किट बेंचमधील कामकाजासाठी  चार न्यायाधीशांची नियुक्ती

by प्रतिनिधी
0 comments
Four judges appointed

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमधील कामकाजारासाठी चार न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. डिव्हिजन बेंचसाठी दोन न्यायाधीशांची तर दोन सिंगल बेंचसाठी प्रत्येकी एक न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. (Four judges appointed)

रविवारी १७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्रीमंडळातील मंत्री, खासदार, आमदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा हजार वकिल उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना प्रोटोकॉलचे पालन करुन कार्यक्रमास उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. (Four judges appointed)

सोमवारी १८ ऑगस्ट रोजी सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी जुन्या न्यायालयाचे सुशोभिकरण करण्यात आली असून दोन न्यायाधीशांसाठी डिव्हिजन बेंचची सोय केली आहे. कोर्ट रुम नंबर एक मध्ये मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एम.एस. कार्तिक, शर्मिला देशमुख यांची नियुक्ती केली आहे. कोर्ट रुम दोन मध्ये सिंगल बेंच असून तिथे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोर्ट रुम तीन मध्ये न्यायमूर्ती एस.जी. चपळगांवकर यांची सिंगल बेंचसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. (Four judges appointed)

दरम्यान सर्किट बेंचच्या उद्घाटनासाठी जिल्हा प्रशासन आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने जय्यत तयारी केली आहे. जुन्या कार्टातील इमारतीत सर्किट बेंच भरणार असल्याने प्रोटोकॉलनुसार सुशोभिकरण करण्यात आले आहे. तसेच सीपीआर चौक परिसर नो पार्किंग, नो हॉकर्स झोन करण्यात आले आहेत. (Four judges appointed)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00