Draper : अल्कारेझला हरवून ड्रेपर अंतिम फेरीत

Draper

Draper

इंडियन वेल्स : इंडियन वेल्स ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटास यावर्षी नवा विजेता मिळणार आहे. कार्लोस अल्कारेझ आणि डॅनिल मेदवेदेव या २०२३ व २०२४ च्या अनुक्रमे विजेत्या व उपविजेत्या टेनिसपटूंना उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. जॅक ड्रेपर आणि होल्गर रून यांनी प्रथमच या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून विजेतेपदासाठी त्यांच्यामध्ये लढत होईल. (Draper)

रविवारी रंगलेल्या उपांत्य सामन्यात ब्रिटनच्या ड्रेपरने स्पेनच्या अल्कारेझला ६-१, ०-६, ६-४ असे पराभूत केले. या स्पर्धेमध्ये अल्कारेझला दुसरे, तर ड्रेपरला तेरावे मानांकन आहे. या दोघांमध्ये यापूर्वी रंगलेले तिन्ही सामने अल्कारेझने जिंकले होते. रविवारी मात्र, ड्रेपरने त्याला वरचढ ठरू दिले नाही. उपांत्य सामन्यातील पहिले दोन्ही सेट एकतर्फी झाले. यांपैकी पहिला सेट ड्रेपरने ६-१ असा जिंकून दिमाखात सुरुवात केली, तर दुसरा सेट ६-० असा जिंकत अल्कारेझने सामन्यात पुनरागमन केले. निर्णायक सेटमध्ये दोन्ही टेनिसपटूंमध्ये चुरशीची लढत झाली. यामध्ये ड्रेपरने ६-४ अशी बाजी मारून सुमारे पावणेदोन तासांनंतर विजय निश्चित केला. या विजयासह ड्रेपरने अल्कारेझची सलग १६ विजयांची मालिकाही खंडित केली. (Draper)

दुसऱ्या उपांत्य सामन्यात डेन्मार्कच्या रूनने रशियाच्या मेदवेदेवला ७-५, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवले. हा निकालही अनपेक्षित ठरला. स्पर्धेमध्ये मेदवेदेवला पाचवे, तर रुनला बारावे मानांकन होते. दोघांमध्ये रंगलेले अगोदरचे दोन्ही सामने मेदवेदेवने जिंकले होते. मात्र, उपांत्य सामन्यात रूनने त्याच्यापेक्षा सरस खेळ केला. रून व ड्रेपरच्या विजयांमुळे या स्पर्धेच्या ५१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच आघाडीच्या दहामध्ये नसणाऱ्या खेळाडूंदरम्यान पुरुष एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. त्याचप्रमाणे, ड्रेपर आणि रूनला जागतिक क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठीही या अंतिम फेरीचा फायदा होईल. (Draper)

हेही वाचा :

पाक ‘टी-२०’मध्येही पराभूत

Related posts

Three parties

Three parties  : अमित शहा महाराष्ट्रातील तीन पक्ष चालवतात

Rills star Ravina

Rills star Ravina : रिल्स स्टारकडून पतीचा खून

Shivchhatrapati Award

Shivchhatrpati Award: शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर