गर्लफ्रेंडसमोर कानशिलात; मुलाने पित्यासह कुटुंबाला संपवले

दिल्ली : वडिलांनी गर्लफ्रेंडसमोर मुलाला कानशिलात मारली. आजबाजुचे लोक हसू लागले. गर्लफ्रेंड आणि आपला अपमान झाला. चिडलेल्या मुलाने अपमानाचा बदला घेण्यासाठी आई, वडिल आणि बहिणीचा गळा आवळून खून केल्याची घटना दिल्लीतील नेब सराय परिसरात घडली. दिल्ली पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून मुलाला अटक केली आहे. (Delhi Crime)

दिल्लीमध्ये बुधवारी (दि.४) एकाच कुटुंबातील वडील, आई, आणि मुलीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी या गुन्हाचा तपास केला असता मुलांनेच कुटुंबाला संपवल्याचे तपासात निष्पण्ण झाले. राजेशकुमार तवंर यांचा मुलगा अर्जुन हा दिल्ली विश्वविद्यालयात शिकत असून तो राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडू आहे. तो कामधंदा करत नव्हता. अर्जुनचे एका मुलीवर प्रेम होते. तिच्याशी विवाह करण्याची इच्छा त्याने वडिलांना बोलून दाखवली होती. परंतु, कामधंदा करत नसल्याने वडिलांनी अर्जुनच्या विवाहाला विरोध केला होता. गेल्या आठवड्यात अर्जुन आपल्या प्रेयसीसोबत बाजारात फिरत असल्याचे वडिल राजेश यांनी पाहिले. त्यावेळी चिडलेल्या वडिलांनी बाजारात गर्लफेंडसमोर अर्जुनच्या कानशिलात मारली. भर चौकात वडिलांनी त्याला ‘मी एकटा कमावतो, नोकरी नसताना तू लग्नाचा विचार कसा करतोस?’ असा दम दिला.

गर्लफ्रेंडसमोर कानशिलातर मारली म्हणून अर्जुन अपमानाने धुमसत होता. बुधवारी त्याने वडील अर्जुन (वय ५१), आई कोमल (४६), आणि बहिण कविता (२३) यांचा गळा दाबून खून केला. अर्जुनचे घरातील कुटुंबांशी संबध तणावपूर्ण होते. तसेच आई वडिल बहिणीला पसंत करत होते. सर्व संपत्ती बहिणीच्या नावावर करणार होते, अशी माहितीही दिल्ली पोलिसांनी दिली. (Delhi Crime)

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

पंतप्रधान मोदी कुवेतच्या ‘सर्वोच्च नागरी पुरस्कारा’ने सन्मानित

अमेरिका सैन्याने स्वत: चे एफ १८ फायटर जेट पाडले