CSIBER: भ्रष्टाचारमुक्त समाजव्यवस्थेसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

CSIBER

कोल्हापूर : भ्रष्टाचारमुक्त समाजव्यवस्थेसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती वैष्णवी पाटील यांनी केले.(CSIBER)

स्वराज्य युवा प्रतिष्ठान, ताराराणी ब्रिगेड आणि दिनकरराव शिंदे, समाजकार्य विभाग, सायबर महाविद्‌यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद‌यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची विश्वविक्रमी अशी सुमारे साडेचार लाख स्क्वेअर फूट रांगोळी साकारणाऱ्या महाराष्ट्रातील महिला सदस्यांचा सत्कार समारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या.

आपल्या अनुभवाच्या आधारे विविध गोष्टींचा दाखला देत कुटुंबांनी आपल्या घरातील व्यक्ती लाच देणार वा घेणार नाही, याची काळजी घेतल्यास निकोप समाज निर्मितीस हातभार लागण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. (CSIBER)

लाच घेणे व देणे हा गुन्हा आहे. वास्तविक, कायद्यामध्ये या कृत्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. याविषयी अधिक जनजागृती करण्याचे काम पोलीस दलासोबतच युवकांनी करणे गरजेचे आहे. त्यांना या कामी मदत व मार्गदर्शन करण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करेल असे त्या म्हणाल्या.

विश्वविक्रमी रांगोळी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल सहभागी महिलांचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते या महिला सदस्यांचा प्रमाणपत्र व मेडल देऊन सत्कार करण्यात आला.

या विश्वविक्रमी रांगोळीचे संयोजक व स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडचे संस्थापक समीर काळे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांना अभिवादन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगून यात कोल्हापूरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महिलांनी सहभाग नोंदवला. ही विश्वविक्रमी रांगोळी साकार करून स्त्री शक्तीचे उदाहरण दाखवून दिले. याची नोंद जागतिक स्तरावर घेतली केली याचा अभिमान असून भविष्यातही या महिला शक्ती द्वारे विधायक उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. (CSIBER)

कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आली याप्रसंगी मधु मेहत्तर यांनी प्रास्ताविक केले. विकास अवघडे यांनी पोवाडा सादर केला. याप्रसंगी सायबरच्या संचालिका डॉ. बिंदू मेनन, डॉ. टी.व्ही.जी. सरमा, डॉ. सोनिया राजपूत, डॉ. विनायक साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पूनम माने बोंद्रे यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. दीपक भोसले यांनी केले. (CSIBER)

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेंद्र जनवाडे, शर्वरी काटकर, अनुराधा लोहार, रेश्मा खाडे, आशा चव्हाण, डॉ. चैताली जाधव, स्नेहल पाटील, वैशाली पोतदार, सारिका जाधव, शुभांगी धुमाळ, पुनम जाधव इत्यादींनी परिश्रम घेतले. अक्षता भोवी यांच्या शिवगर्जनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

हेही वाचा :

अब्जाधीशाच्या मुलीला तुरुंगात कसे वागवले?

शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी उचलले भयंकर पाऊल

Related posts

मुक्तीचे जीवनगाणे…. ब्रिजेट बार्दो, डॉ. रुथ लॉरेन्स

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

भारतीय गणराज्याच्या निर्मात्या