congress session : बेळगावात काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन

बेळगाव : विलास अध्यापक : बेळगावमध्ये २६ डिसेंबर १९२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन झाले होते. त्याला गुरुवारी (दि.२६ डिसेंबर) शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम होणार असून पक्षाच्यावतीने जंगी शक्तिप्रदर्शनही केले जाणार आहे. (congress session )

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार प्रियांका गांधी, अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या निमित्त बेळगावातील चौकाचौकांत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. महापुरुषांचा पुतळा परिसर आणि वेगवेगळ्या प्रसिद्ध स्थळांवर रोषणाईतून झळाळून गेले आहेत.

भविष्यातील धोरण ठरणार

अधिवेशनात ‘गांधी भारत’ या उपकमांतर्गत ‘नव सत्याग्रह’ बैठक होणार आहे. अधिवेशनात महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीनंतर काँग्रेसचे पुढील धोरण आणि भूमिका यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मेळाव्यासाठी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान,’ हे घोषवाक्य देण्यात आले आहे. काँग्रेसचे सर्व खासदार, काँग्रेसचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे.(congress session )

बेळगाव येथे २६ डिसेंबर १९२४ रोजी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात महात्मा गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी अधिवेशनात अहिंसा आणि सत्याग्रहाचा मंत्र दिला होता. या अधिवेशनाला शंभर वर्षे होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून २६ आणि २७ डिसेंबरला विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ डिसेंबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठकही बेळगावात पार पडणार आहे.(congress session )

सीमाभागात उत्साह

कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन आणि काँग्रेस अधिवेशन एकाच वेळी होत असल्याने बेळगाव आणि सीमावर्तीय जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दोन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर सजले आहे. सुवर्ण विधानसौधची इमारत विद्युत रोषणाईने उजळून निघाली आहे. दोन दिवसीय अधिवेशानिमित्त काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गेले दोन दिवस बेळगावात तळ ठोकून आहेत. २७ डिसेंबर रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत सुवर्णसौधसमोर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाची कारणमीमांसा आणि काँग्रेसचे पुढील दिशा ठरवण्यासाठी कार्यकारिणीची बैठक होणार आहे. संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावर या बैठकीत चर्चा होणार आहे. २७ डिसेंबर रोजी सीपीएड मैदानावर जाहीर सभा होणार आहे.

असे होतील कार्यक्रम

  • गुरूवारी, दि. २६ डिसेंबरला काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत ठरणार कृती आराखडा
  • रामतीर्थनगर येथील गंगाधरराव देशपांडे स्मारकाचे अनावरण
  • वीरसौध जवळ काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक
  • शुक्रवारी, २७ डिसेंबरला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते सुवर्णसौध येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण
  • ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
  • सीपीएड कॉलेज मैदानावर जाहीर सभा

हेही वाचा :

‘इंडिया’च्या फेक नॅरेटिव्हविरोधात आघाडी उभारा
ठाकरे गटाने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली!

Related posts

Atal Bihari Vajpeyee अटल वारसा!

Shah Nadda : ‘इंडिया’च्या फेक नॅरेटिव्हविरोधात आघाडी उभारा

Municipal election ठाकरे गटाने मुंबई महापालिकेसाठी कंबर कसली!