chandrakant patil : महिलांची बदनामी होईल असे वक्तव्य करू नका

chandrakant patil

कोल्हापूर : प्रतिनिधी : आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत.  छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडू नये याची नेहमीच काळजी घेतली. सध्या महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू आहेत. या वादाला सामाजिक किनार असून ते अतिशय संवेदनशील आहे. बीडमधील सरपंच हत्येप्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे. अशा संवेदनशील प्रकरणाशी आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्रीचे नाव जोडणे शोभत नाही, अशी टीका उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. (chandrakant patil)

पाटील यांनी भाजपचे आमदार सुरेस धस यांचे चांगलेच कान टोचले. आमदार सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचक्की आणि बदनामी होईल असे वक्तव्य करता कामा नये. मी धस यांना फोन करुन तुम्ही असे करु नये, अशी त्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रिपद स्वीकारल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील रविवारी (दि.२९ डिसेंबर) ते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी सकाळी त्यांचे रेल्वे स्टेशन स्वागत केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी त्यांनी वार्तालाप केला.(chandrakant patil)

बीडमध्ये सरपंच संतोष गायकवाड हत्येसंबंधी प्रश्न केला असता मंत्री पाटील म्हणाले, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सहा दिवसाचे अधिवेशन असूनही या प्रश्नाचे गांभीर्य आणि माणुसकीचा विचार लक्षात घेऊन या विषयावरील चर्चेसाठी  चार ते साडेचार तासाचा वेळ दिला.  या विषयावर सर्वांनी आपली मते मांडली. चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतीही शंका न ठेवता या गुन्ह्यातील आरोपींचा मुलाहिजा ठेवणार नाही, असे सभागृहाला आश्वस्त केले. आरोपींविरुध्द कडक पावले उचलत असल्याचे सांगून त्यानुसार कारवाई सुरू आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतील मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांकडे डावे-उजवे असे काही नसते असेही ते म्हणाले,

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मी मूळचा कोल्हापूरचाच आहे. माझ्यावर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. राज्यभर माझे काम सुरू असले तरी मात्र केंद्र कोल्हापूरातच राहिले आहे. कोल्हापूर नाळ कधीच तुटली नाही आणि तुटणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.(chandrakant patil)

शैक्षणिक धोरणाचा रोड मॅप तयार

मंत्री पाटील म्हणाले, २०१९ मध्ये मला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री मिळाले तेव्हा सर्वांना वाटले मला बाजूला केले आहे. पण काही जणांना माहीत होते की २०२० मध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची घोषणा करणार आहे. त्यावेळचा जुना अनुभव असलेला शिक्षण मंत्री हवा होता. मी विद्यार्थी परिषदेत काम केल्याने शिक्षणासंबधी अनेक विषय हाताळले. ते सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. देशात नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येत असून महाराष्ट्र हे धोरण राबवण्यात दुसऱ्या स्थानी आहे.  नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यास गती येण्यासाठी एकाच माणसाकडे सलगपणे राहिले तर आणखी बरेच काही करता येईल म्हणून उच्च व तंत्रशिक्षण खाते पुन्हा मला मिळाले आहे.  नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी आम्ही पुढील शंभर दिवसाचा रोड मॅप तयार केला असून त्यांचे पेझेंटेशन झाले आहे. प्राध्यापकाने कोणत्याही भाषेत शिकवले तरी विद्यार्थ्याला मराठी भाषेत समजावे, असे सॉफ्टवेअरही डेव्हलप करण्यात आले आहे, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री नियुक्तीबाबत मंत्री पाटील यांना प्रश्न केला असता ते म्हणाले,  भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात समन्वय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चर्चेतूनच पालकमंत्रिपदाचे वाटप करतील. जिल्ह्यातील राजकीय वातावरण लक्षात घेऊन पालकमंत्र्याचे नाव निश्चित होईल.

Related posts

Delhi election: केजरीवाल विरोधात परवेश शर्मा

KMC Water: कोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणीपुरवठा बंद

Karun Nair : करुण नायरचा विश्वविक्रम