पुणे : प्रतिनिधी : शस्त्रक्रियेपूर्वी हॉस्पिटल प्रशासनाने मोठी रक्कम मागितल्याने रुग्णाची मानसिकता खचली आणि ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला. पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार न केल्याने तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नेमण्यात आली होती. समितीचा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल राज्यसरकार आणि महिला आयोगाकडे दिला जाणार आहे. याबाबत आज रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. (Chakankar)
रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली. २८ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता तनिषा भिसे हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि इतर डॉक्टरांना त्यांचे ऑपरेशन करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्टाफने ऑपरेशनची तयारी केली. ऑपरेशनला न्यायच्या अगोदर हॉस्पिटल प्रशासनाने दहा लाख रुपये डिपॉझिटची मागणी केली. हा सर्व प्रकार रुग्णाच्या समोर घडत होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली होती. मात्र हॉस्पिटलकडून कोणतीही दखल करुन घेतली नाही. या सर्व घटनेमध्ये साडेपाच तास रुग्णांवर कोणतेही उपचार करण्यात आले नाही, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले. (Chakankar)
रुग्णाला तुमाच्याकडील असलेली औषधे घ्या असाही सल्लाही रुग्णालयाने दिला. त्यानंतर अडीच वाजता रुग्णाला ससून रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. ससूनमधून अवव्या पंधरा मिनिटात रुग्णाला सूर्या हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे त्यांच्यावर योग्य उपचार झाले. दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. शस्त्रक्रियेला जाण्यापूर्वी मंगेशकर हॉस्पिटलने मोठी रक्कम मागितल्याने रुग्णाची मानसिकता खचली आणि त्यांची मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही चाकणकर यांनी केला. (Chakankar)
राधाकृष्ण पवार यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा अहवालात प्रमुख मुद्दे
आपत्कालीन उपचार व संदर्भ सेवेचा अभाव:
रुग्ण गंभीर स्थितीत असूनही रुग्णालयाने कोणतेही प्राथमिक जीवित रक्षण उपचार (Emergency Life-Saving Treatment) न करता, तिला तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात संदर्भित केले नाही. यामुळे महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी नियम, २०२१ मधील आपत्कालीन सेवेच्या तरतुदींचा भंग झाला आहे.
धर्मादाय योजनेअंतर्गत उपचार न देणे:
रुग्ण पात्र असूनही, तिला धर्मादाय योजनेअंतर्गत भरती करून उपचार करण्यात आले नाहीत. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अॅक्ट, १९५० अंतर्गत स्कीम नंबर ३ नुसार आपत्कालीन रुग्णांना तत्काळ उपचार व जीवनरक्षण सेवा मोफत/सवलतीने द्यावी लागते, परंतु तसे न केल्याचे दिसून आले आहे.
समुपदेशन व माहिती देण्यात गंभीर त्रुटी:
रुग्णालयातील ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टम, धर्मादाय कक्ष व जनसंपर्क अधिकारी यांनी धर्मादाय योजनेची माहिती, खर्चाचे विवरण व सल्ला न देता, समुपदेशनाच्या कर्तव्यात दुर्लक्ष केले. (Chakankar)
हेही वाचा :