bullet went off : गोळी सुटली, आमदाराच्या डोक्यात घुसली…

bullet went off

लुधियाना : पिस्तूल साफ करत असताना अचानक गोळी सुटली आणि थेट आमदारांच्या डोक्यात घुसली. मोठा आवाज आल्यावर पत्नी पळत आली. सुरक्षारक्षकांनी आमदारांना हॉस्पिटलमध्ये नेले, पण उपचारापूर्वीच आमदारांचा मृत्यू झाला. (bullet went off)

लुधियाना पश्चिमचे आम आदमी पक्षाचे आमदार गुरप्रित बासी गोगी शुक्रवारी घरात पिस्तूल साफ करत होते. त्यातून अचानक गोळी सुटल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत होता. अचानक मोठा आवाज आला. थंडीसाठी लावलेला हिटर फुटला, असे समजून त्यांच्या पत्नी दिवाणखान्यात आल्या. तर तिथे गोगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर बंदोबस्तास असलेले पोलिस आणि स्वयंपाकी धावत आला. गोगींच्या डाव्या हातात पिस्तूल होते. त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.(bullet went off)

पोलिसांनी घटनेची माहिती दिली. गोगी आपल्या पिस्तूलची तपासणी अथवा सफाई करत असताना अचानक गोळी उडाली असावी. डिव्हिजन नंबर आठ पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्सपेक्टर बलविंद कौर यांनी गोगी यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नोकरांचे जाबजबाब घेतल्यानंतर ही माहिती दिली. प्राथमिक अंदाजनुसार अपघातात गोळी उडाली आहे. त्यातील एक गोळी त्यांच्या घरातील मंदिराजवळही लागली आहे.

लुधियाना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाच डॉक्टरांच्या पथकाने पोस्टमार्टम केले. माजी आमदार जसपाल सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली. गोगी आणि माझे चांगले संबंध होते. ते आपली छोटी पिस्तूल दाखवण्यासाठी कायम केस खोलत असत. मी त्यांच्याकडे कायम पिस्तूल मागत असे, पण ते नकार देत. ते त्यांचे आवडते पिस्तूल होते. पण त्या आवडत्या पिस्तूलने त्यांचा जीव घेतला. (bullet went off)

हेही वाचा :
आगीपाठोपाठ हिमवादळ!

Related posts

FIR on Lenders : ५ लाख दिले; २७ लाख वसूल केले

Two arrested : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक

Mahakumbh : महाकुंभमेळ्यात मुलायमसिंह यादव यांची मूर्ती