भाजपा व मित्रांची नजर धारावी, सायन कोळीवाड्यावर

मुंबई : विशेष प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ केला आहे. ईव्हीएम हॅक केले जाते याबद्दल लोक बोलतात पण महाराष्ट्रात तर मुख्यमंत्रीच हॅक केला आहे. भाजपा व त्यांच्या खास मित्राची नजर धारावी व सायन  कोळीवाड्याच्या जमिनीवर आहे. धारावीकरांना बेघर करु पाहणाऱ्या प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर द्या असे आवाहन काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी केले आहे.

धारावी विधानसभेच्या काँग्रेस मविआच्या उमेदवार डॉ. ज्योती गायकवाड यांच्या प्रचारसभेत कन्हैयाकुमार यांनी शिंदे -भाजपा सरकारवर तुफान हल्लाबोल केला, ते म्हणाले की, धारावीत कष्टकरी लोक राहतात, त्यांनी मेहनतीच्या जोरावर धारावीचे नाव सर्वत्र पोहोचवले आहे, त्याच धारावीकरांना बेघर करण्याचे पाप भाजपा करत आहे. परंतु धारावीवर कोणतेही संकट आले तर धारावी वाचवण्यात काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी होईल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता तुमच्या सुख दुःखात सहभागी होणारा आहे.  दुसरीकडे महाराष्ट्राशी गद्दारी करणारे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानीशी खेळणारे भाजपा शिंदे यांच्या भ्रष्ट महायुतीत आहेत. घर बनवण्यासाठी जसे एका एका विटेची गरज असते तशीच सरकार बनवण्यासाठी एका एका आमदाराची गरज असते.  विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राशी गद्दारी करुन लाडक्या मित्राचे घर भरणाऱ्या भाजपाला धडा शिकवा. मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजयी झेंडा फडकवा.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ