महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : मराठीतील टीआरपीच्या बाबतीत सर्व रेकाँर्ड मोडलेला बिग बाँसच्या पाचव्या सिझनचा ग्रँड फिनाले आज (दि.६) पार पडत असून या ट्राँफीवर कोण नाव कोरेल याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. यावर्षीचा हा सीझन २८ जुलैला सुरू झाला. १६ सदस्यांचा प्रवास आता सहा सदस्यांपर्यंत आला असून १०० दिवसांऐवजी ७० दिवसांतच संपत आहे. मात्र, या शोला यंदा संपूर्ण महाराष्ट्राने भरभरून प्रतिसाद दिला. (Bigg Boss Marathi 5)
काही आठवड्यापासून या शोचा सूत्रसंचालक महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख या शो पासून दूर होता. मात्र, आज पुन्हा एकदा आपल्या लयभारी स्टाईलने आजचा ग्रँड फिनाले शो गाजवणार आहे. त्यामुळे बिग बाँस प्रेक्षकही त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आपल्या आवडत्या सदस्याला जिंकवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बिग बाँसप्रेमींनी भरभरून व्होटिंग केले आहे. त्यामुळे आज या पाचव्या सिझनच्या विजेत्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले
टॉप सहा सदस्यांमध्ये आज ग्रँड फिनाले पार पडेल. धनंजय पोवार, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर , अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी आणि यापैकी एका सदस्याचं नाव बिग बॉस मराठी सीझन ५ च्या ट्रॉफीवर कोरलं जाईल. आज बिग बॉस सीझन ५ चा विजेता मिळेल. त्याआधी बिग बॉस नवीन ट्विस्ट आणणार का आणि बक्षिसाच्या रकमेत वाढ करत स्पर्धकांना सुखद धक्का देणार का, हे आज ग्रँड फिनालेमध्ये पाहावं लागणार आहे. (Bigg Boss Marathi 5)
बिग बॉस मराठी ५ च्या विजेत्याला मिळणार इतकी रक्कम
बिग बाँस च्या पाचव्या पर्वाच्या विजेत्यासाठी २५ लाख रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते. पण घरातील सदस्यांना वेगवेगळ्या टास्कमध्ये ही रक्कम जिंकावी लागणार होती. यानंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी चक्रव्यूह टास्कमध्ये २५ लाख रुपयांपैकी ८.६ लाख रुपये जिंकले होते. त्यानंतर पहिल्या तिकीट टू फिनालेच्या टास्कनंतर बिग बॉस मराठी सीझन ५ च्या विजेत्याला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रक्कमेत वाढ झाली. या टास्कमध्ये स्पर्धकांना त्यांची किंमत ठरवायची होती. सूरजने हा टास्क जिंकल्यावर त्याची किंमत सहा लाख रुपये बक्षिसाच्या रकमेत जमा झाल्याने बिग बॉस मराठी विजेत्याच्या बक्षिसासाठीची रक्कम आता १४.६ लाख रुपये झाली आहे. आता विजेत्याला १४.६ लाख रुपये मिळतील की, आणखी काही वाढ होईल हे आजचा शो पाहिल्यानंतर समजेल.
बिग बाँस मराठी विजेते…..
बिग बॉस मराठी, एक लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो, २०१८ पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महेश मांजरेकर यांनी चार सिझन आणि रितेश देशमुख यांचा हा पहिला होस्ट केलेला, हा शो कलर्स मराठीवर प्रसारित होतो.चार सीझनमध्ये, मेघा धाडे, शिव ठाकरे,विशाल निकम आणि अक्षय केळकर यांसारखे स्पर्धक विजेते म्हणून उदयास आले आहेत, त्यांनी प्रसिद्धी आणि ओळख मिळवली आहे.
हेही वाचा :